Home विशेष उत्सवात फक्त आम्हीच…..यामुळे जातीपातीच्या भिंती मजबूत होत चालल्यात का?

उत्सवात फक्त आम्हीच…..यामुळे जातीपातीच्या भिंती मजबूत होत चालल्यात का?

अहमदनगर दिनांक 2 ऑक्टोबर

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेले आहेत स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य पूर्वकाळात भारताचा नागरिक म्हणून आणि स्वतंत्र सेनानी म्हणून प्रत्येक जण इंग्रजांशी लढला. अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपले रक्त या भारतासाठी सांडले आहे. अनेक जण फाशी चढले आहेत. कारण त्यांचा अट्टहास एकच होता भारताला इंग्रजांपासून मुक्ती आणि स्वतंत्र भारत.. अनेक लोकांच्या बलिदानानंतर भारत स्वतंत्र झाला मात्र स्वातंत्र्या नंतर भारतात सुरू झाली तो जातीयवाद आपण इंग्रजांपासून भारताला मुक्त देऊ शकलो मात्र या जातीयवादापासून भारताला मुक्ती कधी मिळेल…

सध्या भारतात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून जातीपातीच्या भिंती पुन्हा एकदा मजबूत पणे उभा राहू लागल्या आहेत.मात्र हे भारतासारख्या सर्वभौमत्व असणाऱ्या आणि लोकशाही देशाला भविष्यात परवडणारे नाही हे नक्कीच.

या जातीपातीच्या भिंती पलीकडे जाऊन अनेक विविध समाजातील लोक जात पात विसरून एकमेकांसाठी झटत आहेत.मात्र त्यांच्या या कामाला जातीपातीच्या भिंती उभारणार्‍या लोकांमुळे कुठे तरी अडथळा येतोय आज-काल एक नवीनच फॅशन सुरू झाली आहे कोणताही सण आला कोणताही उत्सव आला तर फक्त ठराविक जातींसाठीच विविध कार्यक्रम राबवले जाऊ लागले आहेत. माणूस हा माणुसकी आणि आपण माणूस आहोत हे विसरून जातीच्या भिंतीच्या आत स्वतःलाच बंदिस्त करून घेताना दिसतोय. सण उत्सवात फक्त आमचा समाज या ठिकाणी येणार.. काही ठिकाणी तर थेट आधार कार्ड तपासणी करण्यात येत होती तर काही ठकाणी लोकांना भर मंडपातून बाहेर काढल्याच्या घटना घडल्या आहेत.फक्त अमका समाज त्या ठिकाणी जाणार अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.यामुळे जातीच्या भिंती मजबूतपणे उभा राहू लागल्या आहेत. सण उत्सव हे सर्वधर्मसमभाव आणि सर्वांना एकत्र येण्यासाठी साजरे करण्याचा हेतू पूर्वीच्या काळी होता मात्र हा विचार आता कुठेतरी बाजूला पडला असून आपणच आपली जात आपला समाज इतरांना दाखवून देतोय काय! आपल्या लहान मुलांना ही गोष्ट लहानपणी डोक्यात घालतोय का? याचा विचारही आपण करत नाही.हे चित्र आता चांगल्या प्रकार जाणवू लागले आहे.आणि यामध्ये ठराविक लोकांनी ठराविक कार्यक्रमाला जायचं आणि त्या कार्यक्रमाला दुसऱ्या समाजातील लोक दिसले तर त्यांना बाहेर काढून देण्याचं प्रमाण सध्या वाढले आहे.त्यामुळे जातीपातीच्या भिंती अधिकच घट्ट रोवल्या जात आहे.

मात्र यातून आपल्याला बाहेर पडणे गरजेचे आहे आपण आपल्या येणाऱ्या पिढीला या जातीपातीच्या भिंतीतून काय संदेश देत आहोत हे आता तरी नाही समजलं तर भविष्यात याचे अनेक वाईट परिणाम दिसून येतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या भिंतींना पाडून सर्वसामाजाची एक वज्रमूठ तयार करणे गरजेचे आहे.अन्यथा पुढील काळात येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही कारण आपणच त्यांना जातीच्या भिंतीमध्ये बंदिस्त करण्यासाठी प्रयत्न करतोय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version