Homeविशेष"कंठा" मधून निघालेल्या सुमधुर स्वरामुळे "विमल गुटख्याचा" व्यवसाय जिल्ह्यातील तेजीत... हेरंब कुलकर्णी...

“कंठा” मधून निघालेल्या सुमधुर स्वरामुळे “विमल गुटख्याचा” व्यवसाय जिल्ह्यातील तेजीत… हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाल्यानंतरही शहरात अवैध गुटखा विक्री सुरूच… हल्ला झाल्यानंतर व्यवसायाचा भाव झाला डबल… हिरा गुटख्याच्या माध्यमातून नगरची माया बारामतीला आणि बारामतीचा कॅन्सर नगरला….

advertisement

अहमदनगर दि.१६ डिसेंबर
महाराष्ट्र शासनाने अवैध गुटखा विक्रीला बंदी घातली असली तरी हा अवैध गुटखा अहमदनगर जिल्ह्यात कोणत्याही टपरीवर खुले आम भेटत आहे. आणि नेहमीप्रमाणे अन्न औषध प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे.अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सुगंधी सुपारी चे रॅकेट फार मोठे रॅकेट आहे. या रॅकेटमध्ये एक गेला की दुसरा येतो दुसरा गेला की तिसरा येतो मात्र हे रॅकेट म्हणजेच साखळी तुटत नाही हे विशेष… बर यामध्ये महत्त्वाचे म्हणजे साखळी जशी जशी वाढत चालली माणसं बदलत चालले तसेच भाव वाढत गेला आहे. त्यामुळे दर महिन्याला लाखो रुपयांची माया या सुगंधी सुपारी, हिरा आणि विमल धंदे वाल्यांच्या माध्यमातून काही ठराविक लोकांना मिळत आहे.

विमल आणि हिरा गुटखा आणि मावा सुगंधी सुपारी,याचा व्यापार सध्या अहमदनगर जिल्ह्यात जोरोशोरो सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी याच अवैध धंद्यांचे टपऱ्या बंद कराव्यात म्हणून मागणी करणाऱ्या दारूबंदी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते आणि मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला होता आणि या हल्ल्यानंतर अवैद्य गुटखा विक्री व्यवसाय करायचा असेल तर डबल भाव झाल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

बारामतीचा “धी” “गां” अहमदनगर जिल्ह्यात हिरा विकून सर्व पैसा बारामतीला घेऊन जातोय मात्र येथील तरुणांना कॅन्सर सारखे भयंकर आजार देऊन जात असताना जिल्ह्यातील काही ठराविक लोकांना मात्र मोठे लक्ष्मी दर्शन होत असून या अवैद्य हिरा, विमल,सुगंधी सुपारी व्यवसायाच्या माध्यमातून जवळपास एक कोटी रुपया पर्यंत लक्ष्मी दर्शन होत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

अहमदनगर जिल्ह्याची विमलची जबाबदारी सध्या कंठ दाटून आलेल्या “ळे” कडे आहे. त्यामुळे कंठाच्या माध्यमातून सर्व सुमधुर स्वर निघत असून सर्व ठिकाणी विमलची माया आणि वास पसरल्यामुळे हा व्यवसाय अत्यंत जोमात सुरू आहे.

हेरंब कुलकर्णी यांच्यवर हल्ला झालेल्या घटनेला दोन महिने झाले आहेत याबाबत हीवाळी अधिवेशनात 28 आमदारांनी सभागृहात याबाबत विचारणा केली होती. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्र्यांनी यावर उत्तर देताना सांगितले की हेरंब कुलकर्णी यांना सशस्त्र पोलीस बंदोबस्त दिला आहे आणि शाळेभोवती पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र यातील पोलीस बंदोबस्त शाळाभोवती ठेवलेला आहे हे शोधावे लागेल.
“मोहा” मध्ये पडून तरणांच्या जीवनाचे “सिन” बिघडवत शहरात सुगंधी सुपारी येत आहे. थोड्या पैशांच्या “मोहा” पाई अनेक तरुणांचे जीवनाचे “सीन” बदलायचे काम सध्या सुगंधी सुपरीच्या माध्यमातून सुरू आहे.
शहरात अवैध्य पान गुटखा टपरी आणि हा व्यवसाय अगदी अन्न औषध प्रशासनाच्या ऑफिसच्या जवळ आणि पोलीस स्टेशनच्या बाजूलाही सुरू असल्याचे दिसून येतेय .आणि नेहमी प्रमाणे अन्न औषध प्रशासन हे कुंभकर्णाच्या झोपेत असून जोपर्यंत या जीवघेण्या गुटख्याने कॅन्सर होऊन माणसं मरत नाही तोपर्यंत अन्न औषध प्रशासनाला जाग येणार नाही. हजारो तरुण कॅन्सरकडे हळूहळू वाटचाल करत आहेत ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. त्यामुळे आता हेरंब कुलकर्णी यांच्याप्रमाणेच प्रत्येक नागरिकांनी जागृत होणे गरजेचे आहे आणि गुटखाबंदीचे कठोर पालन करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडणे गरजेचे आहे तरच हा अवैध व्यवसाय आणि गुटखा यांच्या पासून होणारे रोग आपण थांबू शकतो आणि कॅन्सर कडे वाटचाल करत असलेल्या तरुण पिढीला आपण थांबवू शकतो.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular