अहिल्यानगर दिनांक 31 ऑगस्ट
भारतात ११२.५ कोटी मोबाईल ग्राहक आहेत आणि सर्वाधिक मोबाईल ग्राहक असणारा देश हा भारत देश आहे.
प्रत्येक शहरातील तरुणाई आता विविध व्यसनांच्या आहारी गेले आहेत. आत्ताच्या काळात दारू, तंबाखू , सिगारेट, हुक्का, गांजा आणि अमली पदार्थ याचे सेवन लहान वयातही होताना दिसत आहे. आणि मोबाईलचा वापर ३ ते ८० वयोगट अशा मोठ्या पातळीवर घडताना दिसतोय. हे नक्कीच समाजासाठी हानिकारक आहे.
कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा ती गोष्ट घातक ठरायला कारणीभूत होऊ शकतो. अद्ययावत फोन’ हातात आल्यावर त्याचा मोबाईल हे एक व्यसन सर्वांना व्यापून टाकत आहे.त्याचे होणारे परिणाम जाणवू लागल्यामुळे ‘युनिसेफ’ने देखील शालेय पातळीवर मुलांना मोबाईल वापरायला देऊ नये, असे नियम लागू केले आहेत. भारतात ११२.५ कोटी मोबाईल ग्राहक आहेत आणि सर्वाधिक मोबाईल ग्राहक असणारा देश हा भारत देश आहे. तसेच इंटरनेट स्वस्त असणारा देशात भारताचा पाचवा क्रमांक लागतो.
आपल्या आजूबाजूला सुद्धा आता अशाच लोकांची गर्दी होऊ लागली आहे.शुल्लक कारणावरून जीव घेतले जात आहेत. मोबाईल मुळे घटस्फोट वाढले आहेत. मानसिक रुग्ण वाढू लागले आहेत. सतत मोबाईल वापरल्यामुळे मानसिक ताण, ग्रहणशक्ती कमी होणे, व्यक्ती अति-आक्रमक होणे, एकाग्रता जाणे, निद्रानाश, चिडचिडेपणा वाढणे, नैराश्यता तसेच मूड सतत बदलत जाणे, लोकांशी संवाद कमी, आभासी जगात व्यक्ती गुंग होऊन भास होणे.
आणि यामुळे नाते संपत चालले आहेत. घरात राहूनही प्रत्येक जण आपल्या खोलीमध्ये मोबाईलवर व्यस्त असतो त्यामुळे संभाषण कमी होत चालले आहे आणि यातूनच अनेक चुकीच्या घटना घडत आहेत.
नगर शहरातील अनेक उदाहरणे देता येतील की शुल्लक कारणावरून थेट जीव घेण्या पर्यंत घटना घडत आहेत याला कारणीभूत वाढती बेरोजगारी,मोबाईलचा अती वापर आणि कुठेही उपलब्ध होणारे गांजा, ड्रग्स, आणि दारू यामुळे ठराविक तरुणाई यातून बाहेर पडायला तयार नाही तसेच सोशल मीडियावर रिल टाकून आपण किती मोठी बाई आहोत हे दाखवायचा प्रयत्न हातात बंदूक, सुरे, चाकू घेऊन दहशत पसरेल अशी रिल काढून ती टाकण्याचा जणू काही तरुणांची स्पर्धा लागली आहे. विशेषता 17 ते 25 वर्ष वयोगटामधील तरुणांमध्ये इंस्टाग्राम वर हा फॅड सध्या जरा जास्तीच आहे.
नगर शहर आता हळूहळू विस्तारित होऊ लागले आहे. नगर शहराचा मध्यभाग म्हणजे जुनं नगर आता शांत झाले आहे मात्र नवीन उपनगर अशांत होताना दिसत आहे विशेषता सावेडी भाग हा मोठ्या प्रमाणात विस्तारित होत आहे या परिसरात जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक नवीन वस्त्या या परिसरात नव्याने उभारत आहेत त्यामुळे या भागात कोण दादा होणार अशी स्पर्धा जणू काही लागलेली दिसून येत आहे ही स्पर्धा एवढा मोठ्या प्रमाणात लागली आहे की यातून आता संघर्ष होऊन जीव जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जुने नगर शहर जसे शांत होत चाललंय तसे सावेडी उपनगर परिसर अशांत होत चाललाय.अनेक टोळ्या उदयास येत आहेत. यामध्ये विशेषता 20 ते 25 वर्षाची तरुण आहेत. ना कोणाचा मान ना सन्मान,ना कोणाचा धाक अशी परिस्थिती झाल्यामुळे या टोळ्या हळूहळू आपले डोके वर काढत आहेत सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होत आहे.रात्री बारा वाजता भर रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे फटकडे वाजवणे असे प्रकार सातत्याने सुरूच आहेत.मात्र मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार म्हणून सर्वसामान्य माणूस त्यांच्या वाटेला जात नाही त्रास झाला तरी तो मुकट्याने सहन करून पुढे जाण्याचा मार्ग सर्वसामान्य नागरिक पत्करतो.
विशेषतः पाईपलाईन रोड, तपोवन रोड, बोलेगाव एमआयडीसी या परिसरात काही ठराविक टारगट टोळ्या उदयास आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात नगर शहराला सर्वात मोठी घातक गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांना होणारा त्रास असेल. कायद्यात असलेल्या काही त्रुटींमुळे टोळ्या याचा फायदा घेऊन सारेआम धुडघुस घालत आहे.यातून ताबा, अवैध्य धंदे आणि भाईगिरी वाढत चालली आहे.याचा त्रास जसा सध्या फक्त सर्वसामान्य नागरिकाला होत आहे. त्या प्रमाणे पुढे जाऊन पोलिस प्रशासन आणि राजकीय व्यक्तींना सुधा होणार आहे. सर्वसामान्य नागरिक पोलिस स्टेशनला जाण्यास घाबरतो त्यामुळे अशा टोळ्यांचे फावते आणि भाईगिरी वाढत जाते. त्यामुळे या भाईगिरीला चाप बसणे गरजेचे आहे नाही तर वेळ गेल्यावर काही उपयोग होणार नाही.जो मारतो त्याचे आयुष्य पोलिस केस मुळे बरबाद होतेच त्या बरोबर घरातील इतर सदस्यांना मोठा मानसिक त्रास होतो आणि शेवटी हाती काही लागतच नाही शिक्का लागतो तो फक्त गुन्हेगारीचा..
आपल मुलगा कुठे जातो कोणा बरोबर असतो कुठे बसतो या सर्वांची माहिती नकळत का होईना पालकांनी ठेवणे गरजेचे आहे.वेळ गेल्यावर आपल्या हाती काहीच राहत नाही केवळ राहतो तो पश्चाताप



