आंतरराष्ट्रीय दि २० ,जून
पाकिस्तानातून एक मोठी बातमी आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांचं निधन झालं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज त्यांच्या निधनाची बातमी आली आहे.
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती शुक्रवारी चिंताजनक झाली. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. तथापि, GNN या टीव्ही चॅनलने दावा केला आहे की, परवेझ मुशर्रफ यांना हृदय आणि इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना दुबईमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या आजाराशी झुंज देत असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. 78 वर्षीय मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानवर राज्य केले. मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत राहत आहेत.