अहमदनगर दि.१७ जून
अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवरील पारिजात चौक या ठिकाणी आज दुपारच्या सुमारास एका गादी दुकानाला आग लागल्यानंतर त्याच्या आसपासच्या दुकानेही पेटली होती या गादी दुकानाच्या बाजूला गॅरेज तसेच भंगारचे आणि किचन ट्रॉली बनवण्याचे दुकाने होती ती सर्व आगीत भस्मात झाली आहे. विशेष म्हणजे या दुकानांना आग लागली ते सर्व दुकाने अनाधिकृत असून या दुकानांचा वाद महानगरपालिकेच्या प्रशासनाबरोबर झालेला असताना महानगरपालिकेने ही सर्व दुकाने अनधिकृत असल्याचं निर्णय दिला आहे मात्र तरीही अनेक दिवसांपासून ही दुकाने सुरू होती.
या ठिकाणी अनेक दुकानदार हे बाहेर राज्यातून आले असून या ठिकाणी काही मटण दुकाने सुरू आहेत मात्र या सर्व अनधिकृतपणे पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेल्या दुकानांकडे महानगरपालिका अतिक्रमण विभागाने आणि महानगरपालिका सावेडी विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आजची मोठी घटना घडली.
दैव बलवत्तर म्हणून अनेक लोकांचे प्राण वाचले
या ठिकाणी लागलेल्या आगीत एका दुकानात भले मोठे हवा भरण्याचे कॉम्प्रेसर होते जर आगीमध्ये तापून हे कॉम्प्रेसर फुटले असते तर या आजूबाजूच्या अर्धा किलोमीटरच्या परिसरात याचा धक्का जाणवला असता आणि किती लोकांचे प्राण गेले असते हे न सांगणेच बरे या अनाधिकृत दुकानांवर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत टपऱ्या उभारल्या गेल्या आहेत मात्र तरीही महानगरपालिका अशा टपऱ्यांकडे दुर्लक्ष का करते हा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे महापालिकेतील अतिक्रमण विभाग नेमका करतोय काय असा प्रश्न उपस्थित राहतोय.