अहमदनगर दिनांक 8 ऑगस्ट
माजी जिल्हा परिषद सदस्य आणि उबाठा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आणि नेहमीच जनतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध असणारे संदेश तुकाराम कार्ले यांनी नगर पारनेर विधानसभा मतदारसंघासाठी रणशिंग फुंकले असून 2014 आणि 2019 मध्ये पक्षाकडे मागणी करूनही त्यांना काही कारणास्तव उमेदवारी दिली गेली नाही मात्र मागील लोकसभा निवडणुकीत नगर तालुक्यासह श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यात निर्णय भूमिका बाजवली असेल ती संदेश कार्ले यांनी त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत नगर पारनेर विधानसभा मतदारसंघात संदेश कार्ले यांना उमेदवारी मिळावी यासाठी आता संदेश कार्ले यांचे पाठीराखे प्रयत्न करणार आहेत. तर संदेश कार्ले यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून निवडणुकीसाठी आपणही तयार असल्याचा संदेश जणू काही कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
संदेश कार्ले हे नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी राहून प्रत्येक माणसाचा प्रश्न मुळापर्यंत सोडवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. जिल्हा परिषद च्या माध्यमातून अनेक कामे त्यांनी केलेले आहेत. कामाप्रमाणेच कोणताही प्रश्न असेल तो प्रश्न जोपर्यंत पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचा पिच्छा सोडायचा नाही ही प्रतिमा संदेश कार्ले यांची आहे. वेळ पडली तर मोठ्या शक्तीलाही सामोरे जाऊन आसमान दाखवण्याची ताकद संदेश कार्ले यांनी वेळोवेळी दाखवून दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात उन्हाळा असल्याने अनेक ठिकाणी चारा टंचाई झाली होती मात्र संदेश कार्ले यांनी आपल्या शेतात उभा असलेला ऊस सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी खुला करत तो चारा म्हणून सर्वांना मोफत देऊन टाकण्याची दानत संदेश कारले यांनी दाखवली होती.
पाणी प्रश्न असेल किंवा रस्त्याचे प्रश्न असेल आणि एखादा अपघात झाला तर सर्वप्रथम धाऊन जाणारा सर्वसामान्यांचा नेता म्हणून संदेश कार्ले यांची ओळख नगर तालुक्यात नव्हे तर पूर्ण जिल्ह्याला झाली आहे.
शिवसेनेचा हाडाचा कार्यकर्ता म्हणून संदेश कार्ले यांनी आजपर्यंत पक्षाचे काम केले आहे . पक्ष फुटी नंतरही त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ देत पक्ष वाढवण्याचे काम केले आहे.त्यामुळे 2014 आणि 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी न भेटलेल्या संदेश कार्ले यांना आता 2024 मध्ये संधी देण्यात यावी अशी मागणी संदेश कार्ले यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.तर संदेश कार्ले यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट बरेच काही सांगून जात आहे.