Homeविशेषनगर बदलतय....विकासाकडे झेपावतेय... आमदार संग्राम जगताप यांच्या कामाचा झंजावात....

नगर बदलतय….विकासाकडे झेपावतेय… आमदार संग्राम जगताप यांच्या कामाचा झंजावात….

advertisement

अहमदनगर दि.7 ऑगस्ट

अहमदनगर महापालिकेमार्फत डीपी रस्त्यांसाठी एकूण 313 कोटींचा आराखडा पाठवला गेला होता. पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपये मंजूर झाले. यात नगर शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते, उपनगरातील प्रमुख रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या मोठे यश आले असून नगर शहराचा चेहरा मोहरा आता लवकरच बदलत आहे.

नगर शहरातील बहुतांश ठिकाणी सध्या विविध विकास कामांचा शुभारंभ होत आहे अनेक ठिकाणी काही कामे अंतिम टप्प्यात आले आहेत. नगर शहर आता बदलत आहे आणि विकासाची गंगा शहरात वाहू लागली असेच म्हणता येईल.

प्रामुख्याने नगर शहरात मुख्य प्रश्न होता तो शहरातील रस्त्यांचा तो आता मार्गी लागला असून शहरातील अनेक मुख्य रस्ते आता पक्क्या सिमेंट काँक्रीटच्या साह्याने रस्त्यांची कामे होऊ लागली असल्यामुळे अनेक वर्षांचे रस्त्यांचे प्रश्न आता मिटणार आहे.

नगर शहरातील मुख्य रस्ता असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते थेट पत्रकार चौक हा संपूर्णपणे सिमेंट काँक्रीट चा रोड होत असून याचा पहिला टप्पा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून माळीवाडा वेशी पर्यंत पूर्ण करण्यात आला आहे. दुसरा टप्पा हा माळीवाडा वेशी पासून पंचवीस चावडी आशा टॉकीज चौक ते कापड बाजार मधील भिंगारवाला चौकापर्यंत असणार आहे आणि तिसरा टप्पा भिंगारवाला चौकापासून ते थेट सर्जेपुरा मार्गे लाल टाकी पर्यंत हा सिमेंट काँक्रीट रस्ता होणार असून याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

तसेच नगर मनमाड महामार्गावरील झोपडी कॅन्टीन ते थेट नवीन जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर महामार्गापर्यंत महत्वकांक्षी रोडच्या कामाचा शुभारंभ आठ ऑगस्ट रोजी होणार असून त्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. त्याचप्रमाणे पाईपलाईन रोड आणि तपोवन रोड मधील हॉटेल राजनंदिनी पासून ते थेट भिस्टबाग मार्गे बंधन लॉन पर्यंत रोड चे काम सुरू झाले असून हा मार्ग गुलमोहर रोड,पाईपलाईन रोड आणि तपोवन रोड ला समांतर रोड म्हणून ओळखला जाईल.

तसेच अनेक उपनगरांमध्ये सध्या सिमेंट काँक्रीटच्या रोडचे काम अंतिम टप्प्यात आले असून काही ठिकाणी पूर्णही झालेली आहेत त्यामुळे अहमदनगर शहराची ओळख आता बदलत चालली असून विकासाकडे अहमदनगर शहर झेपावले आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या प्रयत्नातून आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर शहरातील डीएसपी चौक तसेच एमआयडीसी मधील सह्याद्री चौक येथे उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे तर पत्रकार चौक ते डीएसपी चौक दरम्यान चे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

जिल्ह्यातील खेळाडूंना अद्यावत सुविधा निर्माण करून देण्यासाठी वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल अद्यावत करण्यासाठी व खेळाडूंना परिपूर्ण सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडे जिल्हा क्रीडा अधिकार्‍यामार्फत 52 कोटींचा प्रस्ताव पाठविला होता. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाडियापार्क क्रीडा संकुलासाठी 15 कोटींचा निधी मंजूर झाले आहेत यासाठी आमदारसंग्राम जगताप यांनी पाठपुरावा केला होता.

त्यामुळे पुढील काही काळात अहमदनगर शहरातील रस्त्यांचे प्रश्न सुटणार असून स्वच्छ नगर, सुंदर नगर आणि खड्डे मुक्त नगर अशी ओळख होणार आहे.

आमदार संग्राम जगताप यांच्या कामाचा झंजावात सध्या सुरू असून अनेक ठिकाणी रस्त्यांचे आणि विविध विकास कामांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामध्ये रस्त्यांसह अनेक मोठ्या उद्यानांमध्ये म्युझिक फाउंटन आणि चौक सुशोभीकरण यांचेही काम सुरू आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular