पारनेर दि.१६ एप्रिल
पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे यात्रा सुरू असून या यात्रेत तमाशा मध्ये नाचण्यावरून वाद होऊन खाली बस म्हणून सांगण्यास गेलेल्या पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आली आहे.
याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुणोरे यात्रेत पाहुणे म्हणून आलेल्या तरुणांनी हे कृत्य केल्याचं पोलीस सूत्रांकडून समजतंय
तमाशा सुरू असताना मध्येच उठून नाचणाऱ्या तरुणांना पोलिसांनी खाली बसण्याच्या सांगण्यावरून हा वाद झाला पोलिसाच्या अंगावर मोठे टोळके धावून आल्यामुळे काही ग्रामस्थांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला मात्र अतिरिक्त पोलीस कुमक आल्यानंतर झिंगलेल्या तरुणांची चांगलीच झिंग पोलिसांनी काढली होती.