अहमदनगर दि.२४ जानेवारी
बहुचर्चित आणि प्रदर्शना आधीच वादग्रस्त ठारेलला शाहरुख खान याचा पठाण चित्रपट उद्या प्रदर्शित होत असून हा चित्रपट अहमदनगर शहारात प्रदर्शित होऊ देणारा नाही अशी भूमिका बजरंग दलाने घेतली असून अहमदनगर शाहरतील चित्रपट गृह चालकांना याबाबत बजरंग दलाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे जर उद्या चित्रपट दाखवला गेला तर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बजरंग दलाचे शहराध्यक्ष कुणाल भंडारी यांनी दिला आहे.नगर शाहरतील चित्रपटगृहावर मोटार सायकल रॅली काढून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करत विरोध दर्शविला आहे.
यावेळी तोफखाना पोलिसांनी कोहिनूर मॉल येथील चित्रपट गृहा बाहेर बंदोबस्त तैनात ठेवला होता तसेच चित्रपटगृहाचे मॅनेजर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी उद्या हा चित्रपट या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही असे आश्वासन बजरंग दलाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहे