अहमदनगर दि.२४ जानेवारी
तोफखाना पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन कारवाई करत थेट गावठी कट्टे बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून दोन आरोपींना अटक केल्याची कारवाई केली आहे. अहमदनगर शहरात अनेक वेळा गावठी कट्टे विक्रीसाठी आणले असताना पकडण्याची कारवाई पोलीस करत होते. मात्र प्रथमच तोफखाना पोलिसांनी थेट गावठी कट्टे बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून दोन जणांना गावठी कट्टे बनवत असताना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून काही गावठी कट्ट्यांसह गावठी कट्टे बनवण्याची साधनसामग्री हस्तगत करण्यात आली आहे.
जमालसिंग अजितसिंग चावला असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून हे आरोपी मध्य प्रदेश मधील वडवणी तालुक्यातील खुरमाबाद या ठिकाणी गावठी कट्टे बनवून त्याची विक्री करत होता. तोफखाना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तोफखाना पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेश मध्ये गेले होते त्या ठिकाणी खुरमाबाद येथे एका झोपडीमध्ये हा कारखाना सुरू होता गावठी कट्टे बनवत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर झडप टाकून त्यांना अटक केली आहे.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभाग पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे ,पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी ,पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके,पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे,पोलीस नाईक संदीप धामणे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप गिरे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन, पोलीस कॉन्स्टेबल सुनील शिरसाठ, पोलीस नाईक सुरेश वाबळे याच्या पथकाने केली आहे.