Home क्राईम पाथर्डी पोलिस ठाण्यात लाच लुचपतची कारवाई

पाथर्डी पोलिस ठाण्यात लाच लुचपतची कारवाई

अहिल्यानगर दिनांक 17 जून

यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट – नाशिक

▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय- 28 रा.पाथर्डी. जिल्हा अहिल्यानगर

▶️ *आलोसे-* १) लक्ष्मण सुखदेव पोटे वय 35 वर्ष, पोलीस शिपाई/ 538, पाथर्डी पोलीस स्टेशन राहणार तारकेश्वर कॉलनी पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर
२) पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे बक्कल नंबर 1780. पाथर्डी पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर राहणार घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर
३) राहुल शिवाजी साबळे वय 22 वर्षे राहणार शिक्षक कॉलनी, माळी बाभूळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर. (पोलीस कोठडीतील आरोपी)

▶️ *लाचेची मागणी*. – 1500/- रु
*लाच स्वीकारली*. – 1500/- रु

▶️ **लाचेची मागणी*दिनांक .*
दि. 15/06/2025 रोजी

▶️ *लाच स्विकारली-*
दिनांक 17/06/ 2025

▶️ *ताब्यात घेण्यात आलेली मालमत्ता-*
१) आलोसे क्रमांक १ यांचा वापरता मोबाईल.
२) आरोपी क्रमांक ३ याचा शर्ट व पँट

▶️ * *लाचेचे कारण**. यातील तक्रारदार यांचे पाथर्डी येथे शिवनेरी मिसळ नावाचे हॉटेल असून ते रात्री १० नंतर चालू असते व त्यावर गोंधळ होतो म्हणून कारवाई करावी लागेल असे आलोसे क्रमांक १ यांनी सांगून हॉटेलवर कारवाई करायची नसेल तर मासिक २००० रुपये हप्ता द्यावा लागेल असे सांगून तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्या संदर्भात तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीवरून दिनांक 15/6/2025 रोजी पंचां समक्ष पडताळणी करण्यात आली असता आलोसे क्रमांक १ यांनी तक्रारदार यांचे कडून तडजोडीची १५०० रुपये ची हप्ता म्हणून लाचेची मागणी करून ते स्वीकारण्याचे मान्य केले होते.
त्यावरून आज दिनांक 17/6/2025 रोजी आलोसे क्रमांक १ यांच्याशी संपर्क करण्यात आला असता ते पाथर्डी पोलीस स्टेशन कडील पोस्को कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी याच्या वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आल्याचे त्यांनी सांगितले होते व सदर ठिकाणी तक्रारदार यांना त्यांनी बोलविले वरून तक्रारदार यांनी आलोसे क्र १ याची उप जिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे भेट घेतली असता त्यांनी त्यांच्या सोबतच्या त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या पाथर्डी पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर नंबर 680/2025 मधील पोलीस कोठडीतील आरोपी क्रमांक ३ याच्या समक्ष तक्रारदार यांच्याशी चर्चा करून त्यांचेकडे लाचेची १५००/- रु रक्कम देण्यास सांगितली व सदरची रक्कम ही लाचेची रक्कम असल्याचे माहित असतानाही ती घेण्यास नकार न देता आरोपी क्रमांक ३ यांनी ती स्वीकारली व सदर लाचेची रक्कम घेऊन ती पोलिस ठाणेस आलोसे क्र १ याचे सोबत मोटर सायकलने येत असताना रस्त्यावर चहा टपरीजवळ आलोसे क्र २ यांचेकडे सुपूर्त केली व आलोसे क्र २ हे यांनी लाचेच्या रकमेसह पळून जाऊन पुरावा नष्ट केला.

या संदर्भात पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ आरोपी क्रमांक १ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version