Homeशहरअनाधिकृत पत्राशेड होडींग्ज हटणार .... संबंधितांवर गुन्हे दाखल करा मनपा आयुक्त डॉ....

अनाधिकृत पत्राशेड होडींग्ज हटणार …. संबंधितांवर गुन्हे दाखल करा मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे

advertisement

अहमदनगर दि. २०

अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी महानगरपालिकेत अतिक्रमण विभाग तसेच नगररचना विभाग अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन नगर शहरातील अनधिकृत होर्डिंग आणि पत्रा शेड बाबत एक बैठक घेतली.

अहमदनगर शहरात विविध ठिकाणी जाहिरात फलक लावले जातात मात्र उच्च न्यायालयाने अनाधिकृत होडींग्ज हटविणेबाबत निर्देश दिलेले आहेत त्यामुळे विना परवाना लावलेल्या होर्डिंग कारवाई करून होर्डिंग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे तसेच नगर शहरातील शहरासह उपनगरामध्ये सध्या पत्रे ठोकून मोठमोठी दुकाने उभी केली गेली आहेत. मात्र या पत्रा शेडला उभारणी साठी महानगरपालिकेकडून कोणतीही परवानगी दिली नसल्याने ते अधिकृत नसून या सर्व पत्रा शेडचे सर्वेक्षण करुन सदरचे अनाधिकृत बांधकाम हटविणेबाबत महानगरपालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत.

महानगर पालिकेत झालेल्या बैठकीला मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यासह सहाय्यक संचालक नगररचना राम चारठाणकर, अतिक्रमण
विभाग प्रमुख आर. जी. सातपुते, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, मेहेर लहारे,नानासाहेब गोसावी तसेच नगररचना व अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular