अहिल्यानगर दिनांक 28 नोहेंबर
प्रदिप बिशनदास पंजाबी यांचा पुतण्या शिवम हा एम.आय.डी.सी येथील त्यांचे राहुल वाईन्स येथुन क्रेटा कार क्र. एम.एच 16, डि.एम.0575 यामधुन ड्रायव्हर भरत मालसमींदर याचे सोबत 3,00,000/- रु कॅश घेवुन येत असताना ड्रायव्हर भरत मालसमींदर हा आष्टविनायक अपार्टमेंन्ट, समतानगर, येथे भाजी घेण्यासाठी भावाच्या घरी गेला. त्यावेळी अज्ञात चोरट्याने क्रेटा कारचा दरवाजा उघडुन शिवम यास चाकुचा धाक दाखवुन क्रेटाच्या दोन्ही सिटच्या मध्ये ठेवलेली 3,00,000/- रु.रोख कॅश बळजबरीने चोरुन घेवुन पळुन गेले अशी फिर्याद तोफखाना पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री दाखल झाली होती.

या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदिश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी सुरू केला होता.मात्र पोलिसांना क्रेटा चालवणाऱ्या ड्रायव्हरचा संशय आल्याने त्याची सखोल चौकशी केली असता क्रेटा कारवरील ड्रायव्हर भरत अशोक मालसमींदर , त्याचा साथीदार नवनाथ भाऊसाहेब जाधव, याचे सोबत केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून चोरी केलेली 3,00,000/- रु रोख रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली 70,000/- रु किं.ची सुझुकी कंपनीची ऍ़क्सेस मोटार सायकल असा एकुण 3,70,000/- रु किं.चा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री.सोमनाथ घार्गे ,अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर वैभव कलुबर्मे,lउपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पो.हे.कॉ सुनिल चव्हाण, नितिन उगलमुगले, भानुदास खेडकर, योगेश चव्हाण, अब्दुलकादर इनामदार, सुरज वाबळे, सुधीर खाडे, पो.कॉ सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन, सुजय हिवाळे, बाळासाहेब भापसे , दादासाहेब रोहकले, पो.कॉ सौरभ त्रिमुखे, तसेच सायबर सेलचे पो.काँ. राहूल गुंडू यांनी केली आहे