अहमदनगर दि.१६ जानेवारी
तेहतिसावी राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या पुणे येथील वानवडीतील राज्य राखीव पोलिस दल गट एक आणि दोन येथील संकुलात सात ते १३ जानेवारीदरम्यान या स्पर्धेसाठी राज्यातील अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी आपले नैपुण्य दाखवत पदके मिळवले आहेत.या मध्ये गौरव दुरगुडे – जुडो, स्लिव्हर मेडल, कपिल गायकवाड धीरज अभंग – बास्केटबॉल, सारंग वाहे – जुडो- सिल्व्हर मेडल, मनीषा निमोणकर – बॉक्सिंग गोल्ड मेडल, उषा – गोल्ड मेडल, डिस्कस थॉ – कांस्य मेडल, कोमल शिंदे तायकंदो, गोल्ड मेडल – बॉक्सिंग सिल्व्हर मेडल, वर्षा कदम पॉवर लिफ्टिंग – सिल्व्हर मेडल, वेट लिफ्टिंग – सिल्व्हर मेडल, अर्चना काळे पॉवर लिफ्टिंग – सिल्व्हर मेडल, बॉडीबिल्डिंग – कांस्य मेडल मिळवून अहमदनगर जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कौतुक करत त्यांचा सन्मान केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मध्ये सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला तसेच पुढील काळामध्ये यापेक्षाही जास्त पदके जिल्हा पोलीस दलाला मिळाला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करत रहा असंही यावेळी या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी खेळाडूंना सांगितले
स्पर्धेमध्ये १८ क्रीडा प्रकारांचा समावेश होता, यामध्ये १३ संघ सहभागी झाले होते. तर तीन हजार महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले होते. पोलिस अधिकाऱ्यांच्या पत्नीसाठी समारोपाच्या दिवशी सकाळी गोळीबार स्पर्धा आयोजित करण्यात अली होती.