अहमदनगर दि.१२ मे
अहमदनगर शहरातील एका सराईत तडीपार आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे.अहमदनगर जिल्हयातुन लोकसभा निवडणुकीचे अनुशंगाने तडीपार केलेल्या सराईत आरोपी नगर शहरातच फिरताना आढळून आला विशेष म्हणजे हा आरोपी आज लोकसभा निवडणुकीचे मतदान यंत्रे केडगाव येथून प्रशासकीय अधिकाऱ्यांना देत असताना त्या ठिकाणी कॅमेरा घेऊन पत्रकार म्हणून फिरत होता. तडीपार आरोपीची हिम्मत एवढी तो तडीपार असतानाही थेट पोलिसांसमोरच कॅमेरा घेऊन फिरत असल्यामुळे पोलिसांनाही त्याबाबत संशय आला नाही मात्र कोतवाली पोलिसांच्या पथकातील काही कर्मचाऱ्यांना हा माणूस तडीपार असल्याचे संशय आल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता अहमदनगर जिल्ह्यात येणेबाबत कायदेशीर आदेश आहे काय याबाबत विचारना केली असता त्याने त्याचेकडे कोणताही कायदेशीर आदेश नसल्याचे
सांगितले. त्यानुसार पोसई कृष्णकुमार सुधाकर सेदवाड आणि पोलीस कर्मचारी सत्यजित सोनाजी शिंदे त्यास ताब्यात घेवुन कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना कळवुन तडीपार इसमावर माहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ प्रमाणे पोकॉ सत्यम शिंदे यांनी फिर्याद दिली असुन पुढील तपास पोना कवाष्टे करत आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उप विभागीय अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती,
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि योगिता कोकाटे, पोउनि प्रविणपाटील, परि. पोसई सेदवाड, पोहेकॉ औटी, पोकॉ सत्यजित शिंदे, दिपक रोहकले, तानाजी पवार, सुरज कदम,सुरज हिवाळे, पोकॉ राहुल मासाळकर यांनी केली आहे.