अहमदनगर दिनांक 15 मे
पुणे पोलिसांनी महादेव बेटिंग (beting ) प्रकरणी मोठी कारवाई केली असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या ठिकाणी एका मोठ्या इमारतीत छापा टाकून पोलिसांनी काही तरुणांना अटक केली आहे ही चार मजली इमारत बेटिंग साठी वापरली जात होती अशी माहिती समोर आली आहे.
या छाप्यात जवळपास 70 ते 80 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून पोलीस आता या सर्वांची चौकशी करत आहेत. रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई केली असून या बेटिंग ॲपची पाळमूळ संपूर्ण महाराष्ट्रात पसरले असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.
आयपीएल (ipl )मॅच तसेच इतर काही खेळांवर बेटिंग द्वारे बक्कळ पैसा कमवून तरुणांना कर्जबाजारी करणारे हे ॲप बंद करण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांकडून मागणी होत आहे. केंद्र सरकारने या ॲपवर बंदी घातलेली आहे मात्र चोरीछुपे हे बेटिंगचे काम सुरू असून आता महादेव ॲप बरोबर काही सट्टेबागांनी आपले स्वतःचे ॲप सुरू करून तरुणांना कर्जबाजारीच्या खड्ड्यात ढकलण्यासाठी स्वतः काही व्यापारी मैदानात उतरले आहेत.
नगर शहरातही असे ॲप बनवणारे सट्टेबाज असून जवळपास सहा ते सात जणांनी आपले स्वतःचे ॲप बनवून ते तरुणांना बेटिंग करण्यासाठी दिलेले आहेत. मोबाईलचा रिचार्ज प्रमाणे आधी पैसे भरा बेटिंग करा आणि पैसे संपले पुन्हा रिचार्ज करा असा फंडा या ॲपद्वारे वापरला जातो. यामध्ये स्वतः बेटिंग घेणारे मालक असल्यामुळे यामध्ये जुगार खेळणारा खेळाडू कधीच पैसे कमवत नाही मात्र खेळवणारे मालक गडगंज संपत्तीचे मालक होत चालले आहेत. आता पुणे पोलीस या महादेव ॲप आणि इतर ॲप च्या पाळेमुळे शोधण्यासाठी नगर पर्यंत पोहोचणार आहेत अशीही माहिती समोर आली आहे.