Home जिल्हा अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागाला उत्कृष्ठ सिंचन व्यवस्थापन पुरस्कार चिलेखनवाडी उपविभागाचे सहाय्यक...

अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागाला उत्कृष्ठ सिंचन व्यवस्थापन पुरस्कार चिलेखनवाडी उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रवीण दहातोंडे यांना उत्कृष्ठ उपअभियंता तर खडका सिंचन शाखेला उत्कृष्ट कामगिरीबद्दलचा सांघिक पुरस्कार

नेवासा दि.१७ सप्टेंबर-

अभियंता दिनाचे औचित्य साधून देण्यात आलेल्या विविध पुरस्कारामध्ये (awarded) अहमदनगर मुळा पाटबंधारे विभाग(Mula Irrigation Department)अहमदनगर या विभागाला उत्कृष्ठ सिंचन व्यवस्थापनचा सांघिक पुरस्कार(Award for Excellence ) तर नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रवीण दहातोंडे(Praveen Dahatonde) यांना उत्कृष्ठ उपअभियंता पुरस्कार (Outstanding Deputy Engineer) व खडका सिंचन शाखेला उत्कृष्ट कामगिरीबद्दलचा सांघिक पुरस्कार मिळाला आहे.

दि. १५ सप्टेंबर २०२२ रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे जयंती निमित्त नाशिक येथे
जलसंपदा विभागाचे वतीने अभियंता दिन साजरा करण्यात आला.यावेळी मुख्य अभियंता,जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक यांचे अधिपत्याखालील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक तसेच लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर यांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या सिंचन विभाग तसेच बांधकाम विभाग या विभागांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

त्यामध्ये अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागास जलसंपदाचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे आणि अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर श्री. अरुण नाईक यांचे शुभहस्ते उत्कृष्ठ सिंचन व्यवस्थापनाचा सांघिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यकारी अभियंता कु. सायली पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

तसेच नेवासा तालुक्यातील मुळा पाटबंधारे चिलेखनवाडी उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी -१ श्री. प्रविण दहातोंडे यांना उत्कृष्ठ उपअभियंता प्रोत्साहनात्मक पारितोषिक देण्यात आले.तर श्री. स्वप्नील देशमुख यांना उत्कृष्ठ शाखा अभियंता प्रोत्साहनात्मक बक्षीस देण्यात आले.

तसेच मुळा पाटबंधारे उपविभाग नेवासा यांचे अधिनस्त असलेल्या खडका सिंचन शाखेला उत्कृष्ट कामगिरीबद्दलचा सांघिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैयक्तिक पुरस्कारांमध्ये श्री. नितीन लांडे, (मोजणीदार), श्री. नवनाथ शिरसाठ, (कालवा निरीक्षक), श्री. विशाल सानप (दफ्तर कारकून) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विभागीय कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असल्याची माहिती अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कु. सायली पाटील यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version