अहमदनगर दिनांक 17 सप्टेंबर
अहमदनगर शहरातील शहर सहकारी बँकेतील सोने तारण (gold mortgage ) विभागातील गोल्ड व्हॅल्यूअर अजय कपाले याने आणि त्याच्या साथीदारांनी अनेक गोरगरीब लोकांच्या नावावर सोने तारण ठेवून लाखो रुपयांची कर्ज(loan) प्रकरणे मंजूर केली होती. आता या प्रकरणात जवळपास 36 च्या आसपास आरोपी झाले आहेत अजूनही आरोपींची संख्या वाढतच आहे.
कोतवाली पोलीस स्टेशनचे (kotwali polis)पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना या प्रकरणाबद्दल गुप्त माहिती मिळाली होती त्यानंतर त्यांनी खात्री करण्यासाठी आधी गुप्त पद्धतीने तपास केला यामध्ये कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील अभय कदम,सलिम शेख,अतुल काजळे यांना शोध घेण्यास सांगितले होते पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण मोठे असून अनेक बँकांना फसवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करताच शहर सहकारी बँकेने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केला त्यामुळे पुढील कारवाई सुरू झाली पुढील कारवाईदरम्यान पोलीस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे , पोना बापुसाहेब गोरे, पोकॉ गणेश ढोबळे, पोहेकॉ दिपक बोरुडे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोना सलिम शेख, बंडू भागवत, पोकॉ सुमित गवळी, यांच्या पथकाने येथे आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि पुढे हळूहळू या खोटे सोने तारण प्रकरणाचा उलगडा होत गेला.(ahmednager police )
यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांच्या नावावर सोनेतारण कर्ज प्रकरणे झाली आहेत ती लोक अत्यंत गरीब असून काहींचे तर स्वतःचे घरही नाही मात्र त्यांच्या नावावर जवळपास वीस पंचवीस लाख रुपयांचे सोनेतारण कर्ज प्रकरणे केली गेली आहे. या लोकांना गोड बोलून आणि त्यांच्या गरजेचा फायदा घेऊन अजय कपाले आणि त्याच्या साथीदारांनी फसवणूक केली आहे. मात्र आता या सर्वांना कायदेशीर कारवाईला समोरे जावे लागणार आहे.
आत्तापर्यंत ८५२० ग्रँम बनावट सोन्यासह ३ कोटी ९ लाख रुपयाला गंडा
अहमदनगर शहर सहकारी बँकेतील अजय कपाले यांनी केलेल्या कर्ज प्रकरणांमध्ये आजपर्यंत सुमारे आठ किलो५२० ग्रॅम खोटे सोने पोलिसांनी जप्त केल आहे. याची किंमत जवळपास तीन कोटी ९ लाखा पर्यंत असून अजूनही काही बनावट सोने पोलिसांच्या तपासात समोर येऊ शकते. त्याचप्रमाणे अहमदनगर शहरातील नागेबाबा पतसंस्थेच्या आणि भिंगार मधील महात्मा फुले पतसंस्थेच्या काही पावत्या पोलिसांना तपासा दरम्यान आरोपींकडे सापडल्या असल्याने या पतसंस्थेतही बनावट सोने ठेवले असल्याची शंका पोलिसांना असून त्यासाठी पोलिसांनी पतसंस्थेला पत्र दिले आहे. मात्र अद्यापही सोने कारण कर्ज प्रकरणी पतसंस्थांनी तपासणी केली नसल्याने येथे किती सोने सापडेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नगर शहरातील अजून एक पतसंस्था अजय कपालेची शिकार झाली असून त्या पतसंस्थेबाबतही पोलिसांनी तपासाबाबत पत्र दिल्याची माहिती समोर येत आहे. या पतसंस्थेत सोने तारण ठेवून किती रुपयांचे कर्ज वाटले गेले आहेत याबाबत आता पोलीस तपासात सर्व माहिती समोर येऊ शकते.
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच स्टोरी या बनावट सोने तारण कर्ज प्रकरणाची असून जे लोक यामध्ये फसवले गेले आहेत ते लोक सध्या अत्यंत घाबरलेले असून पुढे हे पैसे कसे फेडायचे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.