अहमदनगर दि.१७ सप्टेंबर
अहमदनगर मध्ये प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी भव्य अशा 21 फुटी गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे अहमदनगर मध्ये प्रथमच एवढी मोठी गणपतीची मूर्ती स्थापन होणार असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर प्रेरणा तृष्ठांच्या मंडळात ही गणपती मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी अहमदनगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती येथील माळीवाडा वेशीपासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढून या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
ज्या गणेश मूर्तीची खासियत अशी की या एकवीस फुटी गणेश मूर्तीच्या मागील एका बाजूस लक्ष्मी तर दुसऱ्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही मूर्ती असणार आहेत.आकर्षक अशी ही मूर्ती अहमदनगर शहरात दाखल झाली असून गणेश चतुर्थीच्या दिवशी या मूर्तीची प्रतिष्ठापना आमदार अरुण काका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे.
असा असेल गणपती पहा व्हिडिओ👇