नगर दिनांक 10 जून
सकाळ वृत्तपत्राचे बातमीदार अरुण नवथर यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर कोतवाली पोलिसांनी जेरबंद केला असून हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याच्याजवळ गावठी बंदुकीसह दोन जिवंत काडतूस आढळून आले आहेत.मोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
6 जून रोजी अरुण नवथर यांच्यावर एका अज्ञात आरोपीने त्यांच्या घराजवळ हल्ला केला होता हा अज्ञात आरोपी त्यांच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये संशयरीत्या फिरत असल्यामुळे अरुण नवथर यांनी त्यास हटकले होते याचा राग आल्याने अज्ञात आरोपीने अरुण नवथर यांच्यावर हल्ला करून त्या ठिकाणावरून पळ काढला होता.
याप्रकरणी अरुण नवथर यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतल्यानंतर तपास सुरू केला होता या प्रकरणांमध्ये पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते कारण त्या ठिकाणी फक्त अरुण नवथर यांनी त्या गुन्हेगाराला पाहिले होते तर सीसीटीव्ही अथवा इतर कोणताही परवा नसल्याने पोलिसांनी आपली शोध मोहीम वेगवेगळ्या दिशेने नेऊन सुरू ठेवली होती.
दहा जून रोजी कोतवाली पोलिसांना आरोपी केडगाव परिसरात असल्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे पो.हे.कॉ. राजेंद्र ओटी, पो.हे.कॉ. संदिप पितळे, पो.कॉ. दिपक रोहोकले, तानाजी पवार, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे यांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी बंदूक आणि दोन जिवंत काडतूस आढळून आले. ही गावठी बंदूक त्याने आपला मित्र सुरज उर्फ सोमनाथ केदारे यांच्याकडून घेतल्याची सांगितले.
मोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचा साथीदार सुरज उर्फ सोमनाथ राजु केदारे यांच्या विरोधात कोतवाली, तोफखाना, पारनेर पोलीस स्टेशन मध्ये विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग अमोल भारती, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, स.पो.नि. कुणाल सपकाळे, पो.हे.कॉ. राजेंद्र ओटी, पो.हे.कॉ. संदिप पितळे, पो.कॉ. दिपक रोहोकले, तानाजी पवार, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे यांनी केली आहे.