अहिल्यानगर दिनांक १० जून
नगर शहरातील जिल्हा रुग्णालयातून एक आरोपी पळून गेला असून गेल्या पाच ते सहा दिवसांपासून आरोपी सब जेलमधून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता लघवीचा त्रास होत असल्याची तक्रार असल्यामुळे या आरोपीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र आज सकाळी जिल्हा रुग्णालया मधून हा आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रावांना झाले असून तो खाना पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सुनील उत्तम लोखंडे असे फरार झालेले आरोपीचे नाव असून
तो पुण्यात असताना बडतर्फ झाला होता.
राहुरी येथे त्याने बंदुकीच्या जोरावर एका प्रतिष्ठित महिलेचे अपहरण करून ‘माझ्याशी संबंध ठेव’, असे सांगत मारहाण करण्याऱ्या निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता. ‘माझ्यावर खोटा गुन्हा दाखल का केला?’ असे म्हणत या पोलीस अधिकाऱ्यानं महिलेच्या घरी गोळीबार करून धुडगूस घातला होता. त्या महिलेच्या मुलांना डांबून ठेवले होते. त्यांना वाचविण्यास गेलेले श्रीरामपूरचे तात्कालीन पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने रिव्हलवर रोखले होते त्यावेळी, मिटके यांनी प्रसंगावधान राखल्याने गोळी चुकली आणि उपअधीक्षक मिटके हे थोडक्यात बचावले होते.तेव्हापासून आरोपी हा नगर मधील सबजेलमध्ये होता त्याला नुकतेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.