Home राजकारण मा.मंत्री छगन भुजबळ यांचा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने निषेध सरस्वती मातेची...

मा.मंत्री छगन भुजबळ यांचा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने निषेध सरस्वती मातेची प्रतिमा मा.मंत्री छगन भुजबळ यांच्या घरी पाठवणार – सुमित वर्मा

अहमदनगर दि.३० सप्टेंबर –

मा. मंत्री छगन भुजबळ यांनी एका खाजगी कार्यक्रमात बोलताना विधेची देवता सरस्वती देवीच्या बाबत चुकीचे वक्तव्य केले होते याचे पडसाद राज्यभर उमटले असून मनसे सुद्धा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे.

धर्मात आधीच अधर्मी लोकांचा धुमाकूळ चालला असताना आपण या प्रकारे वक्तव्य करणं आपल्या सारख्या उच्च पदाच्या व्यक्तीमत्वाला शोभत नाही. या मुळे असंख्य हिंदू बांधवांची मनं दुखावली गेली आहे तरी आपणास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सरस्वतीची प्रतिमा पाठवत आहोत तरी आपण हिंदू बांधवांची माफी मागावी अशी अपेक्षा व्यक्त करीत माजी मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, संदीप भांबरकर, राहुल वर्मा, डॉ.संतोष साळवे, राहुल फुलारे, प्रवीण गायकवाड, आदेश गायकवाड, महेश चव्हाण, विजय पाचरणे,सागर गडकर, सोमनाथ ढवारे आदी उपस्थित होते.

जातीवादाला फाटा देऊन आज हिंदू धर्माच्या एकीकरणाकडे लक्ष देणे गरजेचे असताना आपल्या कडून बेजबाबदार पणा घातक ठरेल. आपण विविध पदांवर काम केलेले आहे आपण शांतता समानतेचा संदेश द्यायला हवा तर तुम्ही वेगळेच काहीतरी समोर मांडत आहात ज्याने समाजातील दरी वाढत जाईल, हिंदू धर्मातील सर्व जाती एकत्रीत याव्या असे आपणांस वाटत नाही का ? सरस्वती देवीचा अपमान करून तुम्ही काय मिळवणार आहात ? अभ्यासक्रमात मराठी विषयाच्या पाठ्य पुस्तकातील सरस्वती देवीचा फोटो जसा तुम्ही लोकांनी सरकार च्या माध्यमातून गायब केला तसा आता सरस्वती पुजनाबाबत घाट घातला जात तर नाही ना. आपण समस्त हिंदू बांधवांची माफी मागायला हवी ही आपल्या कडून अपेक्षा व्यक्त करीत आहोत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी यावेळी केली

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version