श्रीगोंदा:दि.१० जानेवारी
बेलवंडी बुद्रुक रयत शिक्षण संIस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथील दहावीत शिकणाऱ्या राहुल बापू शेंडगे याला केंद्र शासनाच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाने विशेष शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. भारत सरकार इंस्पायर अवॉर्ड मानकाद्वारे २०२२-२३ या वर्षातील सोलर रोटाव्हेटर या पर्यावरणपूरक विज्ञान उपकरणाच्या संशोधन वृतीची दखल घेत ही शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
सोलर रोटाव्हेटर या विज्ञान उपकरणाची रचना कार्यपद्धती व जैविक खते निर्माण करणारी सुयोग्य पध्दती उपकरण बनवून दिल्लीला या उपकरणांची माहिती लिंकद्वारे पाठाविली होती. तज्ञ परिक्षक कमिटीने राहुल शेंडगे यास १० हजार रूपयाची शिष्यवृती विज्ञान उपकरण बनवण्यासाठी मंजूर केली आहे. त्याला विभागप्रमूख बापूराव ओहोळ, विज्ञान शिक्षक प्रशांतकुमार गावडे, मानसी देव यांचे मार्गदर्शन मिळाले. शाळा सिद्धी पथक पर्यवेक्षण चेअरमन प्राचार्य नवनाथ बोडखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य याअण्णासाहेब शेलार, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी . तुकाराम कन्हेरकर, सरपंच ऋषीकेश शेलार, प्राचार्य उत्तम बुधवंत सह सर्व शिक्षक बंधुभगीनींनी त्याचे अभिनंदन केले आहे.