Home Uncategorized राणे अन् ठाकरे समर्थक भिडले चिपळून येथे निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक..

राणे अन् ठाकरे समर्थक भिडले चिपळून येथे निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक..

गुहागर दि.१६ फेब्रुवारी
गुहागर येथील सभेच्या पूर्वी भाजपचे नेते निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चिपळून येथे भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूराच्या कांड्या देखील फोडल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी आमदार निलेश राणे यांची गुहागर येथे जाहीर सभा होती. गुहागरला जाण्यापूर्वी निलेश राणे यांचा चिपळून येथे भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी दोन्ही गटात राडा झाला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राणेंचा ताफा पुढे निघूव गेल्यानंतर ताफ्यातील गाड्यांवर मागून दगडफेक करण्यात आली. यावेळी अनेक गाड्यांच्या काचा फुटल्याचे पाहायला मिळाले.

यानंतर पोलीसांनी कारवाई करत दोन्ही गटांना दूर करण्यासाठी लाठीचार्ज करत अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भास्कर जाधव म्हणाले त्यांनी जाणीवपूर्वक उचकवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दगडफेक केल्यानंतर आमच्याकडून दगडफेक झाली. पण पोलिसांनी लाठीचार्ज आमच्यावर केला. अश्रुधूराच्या नळकांड्या आमच्या बाजूने फोडल्या असेही भास्कर जाधव म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version