अहमदनगर दि.२३ नोव्हेंबर
अहमदनगर शाहरतील मार्केटयार्ड मधील ताराचंद बोथरा यांच्या दुकानावर छापा टाकून कोतवाली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रेशन दुकानात विकला जाणाऱ्या सुमारे 160 तांदळाचे कट्टे छापा टाकून जप्त केले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. यामध्ये वाहनाचा चालक सना बेग दुकान मालक दीपक बोथरा यांचा समावेश आहे.