Homeविशेषनगर शहर गुंडा नगर म्हणून प्रसिद्ध होतेय का ? गुंडागर्दी पासून शहराला...

नगर शहर गुंडा नगर म्हणून प्रसिद्ध होतेय का ? गुंडागर्दी पासून शहराला वाचवणे हे पोलिसांप्रमाणे नगरकरांचेही काम… आता गरज रस्त्यावर उतरण्याची अन्यथा ही गुंडागर्दी उद्या तुमच्या घरातही घुसू शकते…

advertisement

अहमदनगर दि.१६ जुलै
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे अहमदनगर शहरात तर आजकाल तरुणांचे बेरोजगार टोळके आणि त्यातून होणारी दादागिरी यामुळे शहरातील कायदा सूव्यावस्था हळूहळू बिघडू लागली आहे. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगण्याची जणू काय फॅशन असून अनेक तरुणांच्या दुचाकी वाहनांमध्ये छोटे-मोठे काम आहे ना शस्त्र ठेवलेले आढळून येते आणि विशेष म्हणजे रील बनवण्याच्या नादात भाईगिरी च्या नादात तरुण कधी कायद्याच्या कचाट्यात सापडतो हे त्यालाच कळत नाही.

आज-काल रील बनवून ते फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप द्वारे व्हायरल करून त्याद्वारे मिळणाऱ्या लाईक वर तरुणाई जीवन जगत आहे मग लाईक मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी आजकालच्या तरुणांमध्ये आहे चित्रपटातील डायलॉग आणि हातात शस्त्र घेऊन रिल बनवले जातात आणि मग त्याला अनेक फॉलोवर झाल्यानंतर तो तरुण आपोआप भाई होतो.

त्याचप्रमाणे अवैद्य व्यवसाय, ताबा,जमिनी बळकवने, गोवा,हिरा,यांची तस्करी असे बेकायदेशीर धंदे करून विना कष्ट पैसे मिळत असल्याने यातून भाईगिरी वाढत चालली आहे. त्याचप्रमाणे विविध उत्सव मिरवणुका आणि या उत्सवा मिरवणुका दरम्यान लागले जाणारे मोठमोठे फ्लेक्स आणि त्यापेक्षा माध्यमातून वर्चस्व गाजवण्याची स्पर्धा यातूनही भाईगिरी सुरू झाली आहे कोणत्या परिसरातला कोणाचा वचक आहे हे दाखवून देण्याच्या नादात अनेक तरुण एकमेकांविरुद्ध हातात शस्त्र घेऊन उभे राहत आहेत.

गेल्या महिन्यात नगर शहरात झालेले खून प्रकरण असो त्यानंतर पाईपलाईन रोड भागात तरुणांच्या टोळक्यात झालेला राडा असो किंवा दोन दिवसांपूर्वी एका उद्योजकाला आणि त्याचा मुलाला कट मारण्याचा कारणावरून झालेली मारहाण असो आणि अंकुश चत्तर याच्यावर झालेला खुनी हल्ला या मागे गुन्हेगार पाहिले तर सर्व तरुण मुलेच आहेत आणि वर्चस्वासाठी आणि अवैध धंद्यांमुळे झालेले ही प्रकरण असून पोलिसांनी आता कोणाचीही गयावया न करता दांडके चालवणे गरजेचे आहे. रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध ठिकाणी तरुणांचे टोळके नशा करत उभे असतात नगर शहरात गांजा सहजपणे उपलब्ध होतो. रात्रीच्या वेळेस तारकपूर स्टॅन्ड,माळीवाडा बस स्थानक, पुणे बस स्थानक या ठिकाणी तरुणांचे टोळके कोणता नशा करतात हे सुद्धा पोलिसांनी तपासणे गरजेचे आहे. तसेच प्रोफेसर कॉलनी चौकातील नाट्यगृहाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी रात्री गांजाचा अड्डा खुलेआम सुरू असतो या ठिकाणी अनेक तरुण मुलं आणि शाळकरी मुलं गांजाची चिलीम ओढताणा सर्रास दिसून येतात.

राजकारणात येण्यासाठी अनेक भावी नेते विविध ग्रुप स्थापन करतात आणि अशा ग्रुपच्या माध्यमातून तरुणांचा जमा करून विविध प्रलोभने देऊन तरुणांचं जीवन खराब करण्याचे काम सध्या नगर शहरात सुरू आहे. बेरोजगारी मुळे अनेक तरुण सध्या अशा प्रलोभनांना बळी पडतात आणि कष्ट न करता मिळणाऱ्या पैशांना भुरळून जाऊन आपले आयुष्य बरबाद करतात ही वस्तुस्थिती अहमदनगर शहरात आहे.


आता पोलिसांबरोबरच नगरवासियांनी सुद्धा अशा गुंडागर्दी विरुद्ध रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. आज शेजारच्या घरापर्यंत हे लोन आले आहे उद्या आपल्या घरातही अशी अवस्था होऊ शकते त्यामुळे नगरकरांनी रस्त्यावर उतरून अशा चुकीच्या गोष्टींना रोखण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे नागरिक जेवढे जबाबदार आहेत त्याप्रमाणे पोलीसही या प्रकारांना तेवढेच जबाबदार असून गुंडांवर वचक बसवण्यासाठी त्यांना सलाम न ठोकता दंडूक्याचा प्रसाद दिला तरच हे गुंड वठणीवर येतील अन्यथा नगर शहरात रोजच गावठी कट्टे, तलवारी आणि कोयते निघतील आणि एखाद्याचा प्राण घेतील.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular