अहमदनगर दि.१६ जुलै
लहान मुलांच्या भांडणातून मोठ्या हाणामारीची घटना अहमदनगर शहरातील एकविरा चौकात रात्री दहाच्या सुमारास घडली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले अंकुश चत्तर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मॅक केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी आता तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कु-हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकविरा चौक परिसरामध्ये लहान मुलांचे भांडण झाले होते हे भांडणे मिटवण्यासाठी अंकुश चत्तर यांनी यांच्या भाच्याला त्या ठिकाणी पाठवले होते. हे भांडणे मिटवल्यानंतर अंकुश चत्तर यांनी सर्व मुलांना त्या ठिकाणी सांगितले त्याच वेळी त्या ठिकाणी राजू फुलारी यांनी अंकुश चत्तर यांना बाजूला घेऊन बोलायचे आहे असे सांगून थांबून ठेवले त्या वेळी तेव्हा दोन मोटार सायकलीवरूनकाही मुले आले व त्यानंतर दोन काळ्या रंगाच्या चारचाकी गाडया तेथे आल्या आणि त्यातून उतरलेल्या तरुणांनी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणांच्या हातात लोखंडी
रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे, गावठी कट्टा होता तुला आम्ही जिवंत सोडणार नाही. तु स्वप्निल भाऊच्या नादी लागतोस काय त्याचवेळी स्वप्निल शिंदे अंकुश खाली पडलेल्या ठिकाणी आला आणि हा संपला का पहा रे,नसेल संपला तर त्यास संपवुन टाका असे म्हणून डोक्यात लोखंडी रॉड पुन्हा मारहाण केली असल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.