Home राज्य दि नाशिक मर्चन्ट्स को-ऑपरेटिव्ह बँकेसह इतर बँकांना 50 लाख रुपयांचा दंड रिझर्व्ह...

दि नाशिक मर्चन्ट्स को-ऑपरेटिव्ह बँकेसह इतर बँकांना 50 लाख रुपयांचा दंड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली कारवाई

दिल्ली.१२ जुलै

दि नाशिक मर्चन्ट्स को-ऑपरेटिव्ह बँकेसह इतर
बँकांना 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला
आहे. बँकेतील ठेवींचे नियोजन आणि ठेवींवरील
व्याज या संदर्भात रिझर्व्ह बँकेतर्फे जारी करण्यात
आलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने ही कारवा
करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी द नाशिक मर्चन्ट्स को-ऑपरेटिव्ह बँकेसह तीन सहकारी बँकांना दंड  ठोठावला आहे.नियमांच्या पालनात ढिलाई केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. फ्रॉडची सूचना  आणि निगराणी यांसदर्भात नाबार्डद्वारे (राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक) देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने मुंबईस्थित महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँकेला 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वीही, गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली होती.

रेग्युलेटरी नियमांच्या पालनात ढिलाई केल्याने रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेला 1 कोटी 05 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. इंडसइंड बँकेविरोधाही कारवाई करण्यात आली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version