Home शहर येत्या ३० दिवसात खुलासा करा बँकिंग लायसन्स रद्द का करू नये? आरबीआयची...

येत्या ३० दिवसात खुलासा करा बँकिंग लायसन्स रद्द का करू नये? आरबीआयची नगर मधील “या” बँकेला नोटीस!

अहमदनगर दि.१५ जुलै
नगर अर्बन बँकेच्या मागील साडेसाती संपता संपत नसल्याचं दिसून येत आहे काही दिवसापूर्वीच नगर अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी आपला पदाचा राजीनामा दिला असून त्याआधी एका महिला संचालीकेने राजीनामा दिला आहे. या गोष्टीची चर्चा शामली नाही तोपर्यंत आता नगर अर्बन बँकेला नवीन धक्का बसला असून थेट रिझर्व बँकेने नगर अर्बन बँकेला नोटीस पाठवली आहे.

नगर अर्बन बँकेत झालेल्या व होत असलेल्या नियमबाह्य कामकाजाचा जाब विचारला आहे. थकीत कर्ज वसुली, वाढलेला एनपीए, रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन तसेच अनियमितता अशा विषयांवर येत्या ३० दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आला आहे.एकूण कारभार पाहता बँकेचे लायसन्स रद्द का करू नये व लिक्विडेशन का करू नये याचा खुलासा मागविणारी ही नोटीस रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर अभिनव पुष्प यांनी अर्बन बँकेला पाठवली आहे.

खातेदारांचे ई-केवायसी करण्याचा नियमही पाळण्यात आला नाही. कर्ज वसुलीतही आदेश देऊनही अर्बन बँकेने मोठा हलगर्जीपणा केला आहे. किमान भांडवलाच्या निकषातही बँक कमी पडत आहे तसेच ठेवीदारांनाठेवी परत करण्यासही बँक असमर्थ दिसत आहे. बँकींगच्या अनेक तरतुदी, नियमांचेसंपूर्ण उल्लंघन बँकेने केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version