Home Uncategorized पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह सहा डॉक्टरांच्या विरोधात...

पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह सहा डॉक्टरांच्या विरोधात किडनी तस्करी प्रकरणी गुन्हा  दाखल

पुणे दि.१२ मे

पुण्यातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमधील किडनी तस्करी प्रकरण समोर आले असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारिका सुतार यांची किडनी काढून दुसऱ्या रुग्णाला बसवण्यात येणार होती त्यापोटी सारिका सुतार यांना पंधरा लाख रुपये देण्याचे कबूलही करण्यात आले होते मात्र सारिका सुतार यांना 15 लाख रुपये न देता चार लाख रुपये देऊन त्यांना फसवण्याचा प्रकार समोर आला होता हे सर्व पोलीस तपासात समोर आले आहे.

सारिका सुतार यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली होती या फसवेगिरी प्रकरणात रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह हॉस्पिटलमधील सहा डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ज्या महिलेची किडनी काढण्यात आली ती महिलाही बनावट कागदपत्रं तयार करून यात सहभागी असल्याचं आढळून आल्याने तिच्यावरही पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे.  एकूण 15 जणांच्या विरोधात पुणे पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला आहे.

पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी एका महिलेने तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने याआधी कारवाई करत रूबी  हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला होता.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version