अहमदनगर दि.८ डिसेंबर –
अहमदनगर शहरातील अशा टॉकीज चौक परिसरात राहणारा एक युवक आणि केवळ हॉस्पिटल या परिसरात राहणारा एक युवक या दोघांमध्ये सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटस वरून फोनवरून शिवीगाळ झाल्याची घटना सायंकाळी घडली. यामुळे अशा टॉकीज चौक आणि केवळ हॉस्पिटल परिसरा मध्ये मोठा जमा जमला होता. मात्र याची माहिती कोतवाली पोलिसांना कळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी तातडीने घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही परिसरातील जमाव पांगवला या घटनेनंतर अशा टॉकीज चौक आणि केवळ हॉस्पिटल परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून एक आरसीबीची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरातील चौपाटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कापड बाजारातील हतगाड्यांना लवकर घरी जाण्यास सांगितले तसेच छोटे-मोठे हॉटेल्स लवकर बंद करण्यात आले होते. त्यामुळे शहरात एक तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी आता कोतवाली पोलीस ठाण्यात स्वतः पोलीस फिर्यादी होऊन या दोन्ही जमावाविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलीस प्रशानाकडून मिळाली आहे.