Homeशहरएका वर्षातच सभा मंडपाच्या कामाचे तीन तेरा... माजी खासदार सुजय विखे पाटील...

एका वर्षातच सभा मंडपाच्या कामाचे तीन तेरा… माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या निधीतून झालेला सभामंडप वर्ष भरातच कोसळू लागला…केडगाव उपनगरातील प्रकार..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 6 जानेवारी
आले नगर शहरातील केडगाव उपनगरात माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या निधीतून मागील वर्षी बांधलेल्या गणपती मंदिराच्या समोरील सभा मंडपाला एका वर्षातच गळती लागली आहे. तर प्लास्टरचा काही भाग उखडून पडला असल्यामुळे एका वर्षातच या कामाचे तीन तेरा वाजले आहेत .त्यामुळे या कामाचे भविष्य किती दूरपर्यंत जाईल हे आत्ताच्या कामावरूनच लक्षात येत आहे. जनतेच्या पैशातून विकास निधी उपलब्ध होत असताना त्याची अशी उधळपट्टी होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

केडगाव उपनगरातील प्रभाग क्रमांक 17 मधील माहीनगर दूध सागर येथील श्री गणपती मंदिर येथे सभा मंडपासाठी खासदार निधी उपलब्ध झाला होता या उपलब्ध निधीमधून श्री गणपती मंदिरासमोर सभा मंडप उभारण्यात आला आहे. मात्र या कामाला अजून वर्ष ही झाले नाही तोच बांधकाम खराब झाले असून मध्यंतरी झालेल्या पावसात संपूर्ण सभा मंडप गळालेला आढळून आला तर सध्या या सभा मंडपाचे प्लास्टरचे पोपडे खाली पडत असल्यामुळे भक्तांना आता मंदिरात जाण्यासाठीही भीती वाटू लागली आहे.

भाग्योदय मर्यादित संस्थेने बांधकामाचा ठेका घेतला होता तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम करण्यात आले होते मात्र एका वर्षातच या बांधकामाचे तीन तेरा वाजल्यामुळे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला याबाबत नोटीस अदा केली आहे.

सरकारकडून कोणताही येणारा निधी हा जनतेच्या पैशांतूनच उपलब्ध होत असतो. मात्र याच निधीच्या माध्यमातून विविध विकास कामे होत असताना मोठा भ्रष्टाचार होऊन काही ठराविक लोकच गब्बर होत चालले आहेत आणि काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे एकाच कामाला अनेक वेळा निधी उपलब्ध करून द्यावा लागत आहे. जनतेच्या पैशाच्या अशा नासाडीमुळे जनतेच्या खिशावर सरकारी दरोडा पडतो का काय अशी परिस्थिती सध्या असून या ठेकेदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular