अहिल्यानगर दिनांक ८ डिसेंबर
विधानसभा निवडणूकी पूर्वी महायुतीकडून लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. महिलांना सक्षम बनविण्यासाठी महायुतीसरकार कडून ही योजना सुरु झाली. त्याचं धर्तीवर अहिल्यानगर मध्ये महिला व युवती ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, सुरक्षित राहावे यासाठी माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या वतीने मोफत सुरक्षा ॲप महिला व युवतीसाठी भेट देण्यात आले आहे. लाडकी बहीण सुरक्षित बहीण या ब्रीदवाक्यचा वापर करत महिला सुरक्षित राहणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या भावनेतून माजी नगरसेवक निखिल वारे यांनी *निडली सॉस* हे ॲप्लीकेशन शहरातील सावेडी उपनगरातील महिलांना मोफत उपलब्ध करून दिले आहे. महिला किंवा युवतींना असुरक्षिततेची भावना तयार होईल किंवा कुठल्याही संकटाची जाणीव झाल्यास मोबाईल मध्ये असलेल्या *निडली सॉस* या एप्लीकेशन चा वापर केल्यास जवळच्या चार नातेवाईकांना आपोआप मेसेज पाठविला जातो. त्याचप्रमाणे महिला किंवा युवतींचे लाईव्ह लोकेशन देखील नातेवाईकापर्यंत पाठविला जातो आणि ते लोकेशन ट्रॅक करून संकटग्रस्त मुलींपर्यंत पोहोचण्यास मदत होते त्याचप्रमाणे मोबाईल मध्ये एप्लीकेशन असल्यास अशा संकटावेळी मोबाईल मधला सायरन देखील वाजतो आणि त्यामुळे संबंधित समोरील व्यक्ती गोंधळात पडतो हा ॲप महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असल्याने माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नातून हे ॲप महिला व मुलींना मोफत देण्यात येणार आहेत विशेष म्हणजे हे ॲप फक्त महिलाच नाही तर सर्वजण वापरू शकतात ज्या लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्या सर्वांनी हे ॲप डाऊनलोड केले तर त्यांच्याही मोबाईल मध्ये हे ॲप वापरू शकणार आहेत अपघात असेल किंवा इतर काही संकटकालीन गोष्टी आहेत त्या सर्वच गोष्टींसाठी हे ॲप सुरक्षेच्या दृष्टीने आणि संपर्काच्या दृष्टीने सर्वांना उपयुक्त ठरणार आहे घरातील वयोवृद्ध नागरिक तसेच कॉलेजला जाणारी मुलं बाहेरगावी जाणारी नागरिक या सर्वांसाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.
अभिनव आयटी सोल्युशन्स पुणे आणि नगरचे साई टेक्नो सर्विसेस ज्यांच्या माध्यमातून हे उपयुक्त असे ॲप बनवण्यात आले असून या ॲपमध्ये अजूनही अनेक उपलब्धता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे साई टेक्नो सर्विसेस चे अजित रोकडे यांनी सांगितले आहे. एखाद्या महिलेला अथवा मुलीला एखाद्या गुंडा छेडछाड केली अथवा अन्य काही प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या गुंडाने त्या महिलेजवळचा मोबाईल हिसकावून घेतला आणि मोबाईल बंद करण्याचा प्रयत्न केला तर तर ॲपचे त्या नराधमाचा फोटोही आणि काही सेकंदाचा व्हिडिओही या ॲपद्वारे मोबाईल मध्ये चित्रित होऊ शकतो अशीही सुविधा या ॲपमध्ये देण्यात आली आहे त्यामुळे महिलांसाठी संपूर्ण सुरक्षित असा हा ॲप असून लवकरच हा ॲप आता सर्व नगरवास्यांना मिळणार असल्याचेही अजित रोकडे यांनी सांगितले.