अहमदनगर दिनांक २४ ऑगस्ट
सावेडी महावितरण कार्यालयाचा फोन नंबर बदलला असून आधीचा लँडलाईन नंबर मध्ये अनेक वेळा अडचणी येत असल्यामुळे विद्युत ग्राहकांसाठी महावितरण कार्यालयाने नवीन नंबर जाहीर केला आहे. 8956966460 (८९५६९६६४६०) हा नवीन नंबर असून यापुढे महावितरण कार्यालयाच्या कामकाजाबद्दल किंवा काही तक्रारी बद्दल संपर्क साधण्यासाठी वरील नंबरचा वापर करावा असे आवाहन सावेडी महावितरण कार्यालयाचे अधिकारी बारगळ यांनी केले आहे.
सावेडी महावितरण कार्यालयाचे स्थलांतर झाले असून प्रोफेसर कॉलनी इथून हे कार्यालय आता न्यूक्लियस हॉस्पिटल जवळ स्थलांतरित झाले असून. ग्राहकांना काही तक्रारी असल्यास या नवीन स्थलांतरित झालेल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आला आहे.