Homeशहरस्कूल व्हॅनचा सुळसुळाट; प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) दुर्लक्ष...ओव्हरलोड वाहनांच्या सुलभ प्रवासासाठी लक्ष्मी...

स्कूल व्हॅनचा सुळसुळाट; प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) दुर्लक्ष…ओव्हरलोड वाहनांच्या सुलभ प्रवासासाठी लक्ष्मी दर्शनासाठी उबेदचा दम…लकी,रोमी,वल्लभ सैरभैर..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 21 मे

नगर शहरात खासगी व्हॅनमधून मोठ्या प्रमाणात अवैध विद्यार्थी वाहतूक केली जात असून, त्याकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) दुर्लक्ष होत आहे.

शहरात सध्या प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी स्कूल व्हॅन व स्कूल बस आहेत. त्यामध्येही अनेक स्कूल व्हॅनची अद्याप योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण केलेले नाही. त्या बस रस्त्यावर धावत असताना ‘आरटीओ’कडून काहीही कार्यवाही होताना दिसत नाही. याबरोबरच रिक्षा व खासगी व्हॅनमधून सर्रासपणे विद्यार्थी वाहतूक सुरू आहे. तसेच, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक केली जात असल्याचे दिसून येते; मात्र ‘आरटीओ’कडून या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली, तरच ‘आरटीओ’ जागे होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मात्र काही ठराविक एजंट या सर्व विद्यार्थी वाहतूकदारांकडून दर महिन्याला ठराविक रक्कम घेऊन त्या अधिकाऱ्यांना देऊन सर्रासपने नियम भंग करून शहरात स्कूल बस चालवून देतात जो कोणी पैसे देण्यास नकार दिला त्यावर मात्र निश्चित कारवाई होते.

वाहतुकीचे नियमभंग व विविध प्रकारची कारवाई करण्यासाठी ‘आरटीओ’कडून भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून शहराच्या जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात वाहतूक नियभंगाची वेगवेगळ्या प्रकारची कारवाई केली जाते. पण, या पथकांना खासगी व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूक केली जात असल्याचे दिसत नाही का असा प्रश्न आहे. तसेच, बऱ्याच रिक्षांमधून व व्हॅनमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक केली जाते. त्यामध्ये वाहनांची कागदपत्र, बस, रिक्षा आणि व्हॅनमध्ये मदतनीस आहे का, चालक आणि मदतनीस यांची चारित्र्य पडताळणी झाली का यासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य काटेकोर तपासणी करण्यात येते का असाही प्रश्न उपस्थित होतोय.

शहरातील बहुतांश स्कूलमध्ये खासगी स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूक केली जाते. त्या मध्ये महिला अटेंडन्स नसतात. या स्कूल व्हॅनची ‘आरटीओ’कडे नोंदणीच नसल्यामुळे तिचे फिटनेस केलेले नसते. त्यामुळे दररोज जीव मुठीत धरूनच विद्यार्थी अशा स्कूल व्हॅनमधून प्रवास करत आहेत. त्यामुळे ‘आरटीओ’ने अशा स्कूल व्हॅनवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच, पालकांनी देखील स्कूल व्हॅनची सर्व कागदपत्रे तपासूनच त्यामधून मुलांना पाठवावे.

त्याचबरोबर शहरातून ओव्हरलोड वाहने सुरळीतपणे जाऊन देण्यासाठी महिन्याला जी रक्कम दिली जाते ती लाखो रुपयांमध्ये मध्ये आहे.त्यासाठी रोमी , लकी , वल्लभ, यांच्यासह अनेक जण अहोरात्र कबाड कष्ट करून अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन देत असतात. मात्र या महिन्याला लक्ष्मी दर्शनाची मागणी वाढीव रकमेची झाल्यामुळे मात्र सर्वांमध्ये अस्वस्थता असून या वाढीव लक्ष्मी दर्शनामुळे मतभेद होत आहेत. मात्र त्या अधिकाऱ्याचा आदेश हा अंतिम असतो अन्यथा काय होईल हे माहीतच आहे हे उबेद सर्व एजंट लोकांना वारंवार सांगून एक प्रकारे धमकी देत आहे. सध्या तरी उबेद हाच कार्यालय चालवतो का काय असाच प्रश्न पडत असून. या मोठ्या लक्ष्मी दर्शनावर लवकरात लवकर तोडगा काढा अन्यथा गाड्यांच्या कारवाईला समोरचा असा सज्जड दम उबेद याने दिला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular