अहिल्यानगर दिनांक 20 मे
न दिसणारा भ्रष्टाचार हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू असतो. या मध्ये एजंट, शिपाई, क्लार्क, अधिकारी या सर्वांचीच टक्केवारी ठरलेली असते. तक्रार केली तरच कारवाई असे स्वरुप असते.
आरटीओच्या कार्यालयात सुरु असलेला भ्रष्टाचार आणि होत असलेली सर्वसामान्यांच्या पिळवणुक ही त्या पिळवणूक झालेल्या माणसालाच माहीत असते.
आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचारावर चर्चा करून हा शब्दच जणू गुलगुळीत झाला आहे. एखाद्या वेळी कारवाई होते आणि काही काळ हे कार्यालयात चर्चेत राहते. पुन्हा ये रे माझ्या मागल्या असा प्रकार घडत असतो.
कीतीही ऑनलाइन कारभार झाला असला तरी भ्रष्टाचार कमी झालेल्या नाही याउलट तो जास्त वाढलेला आहे.यासाठी क्लार्क, अधिकारी आणि एजंटाची प्रत्येक कामासाठी टक्केवारी ठरलेली असते.
आरटीओ कार्यालयात सुमारे शंभर वरून अधिक एजंट आहेत. चारचाकी वाहनांत बसून हा सर्व व्यवहार चालतो. प्रत्येक अधिकाऱ्याचा खासगी पंटर ठरलेला आहे. L त्यासाठी कार्यालयीन यंत्रणेचेही पाठबळही मोलाचे ठरते. ‘मी लाच घेत नाही’ असे म्हणणारे काही महाभागांना संध्याकाळी एजंटमार्फतच टक्केवारी मिळते. कर्जाचा बोजा कमी करणे (एच. पी. टर्मिनेशन) लर्निग लायन्सस, परमंट लायसन्स, रिक्षा पासिंग, वाहन ट्रान्स्फर, लायसन्सचे नूतनीकरणासाठी प्रत्येक एजंटाचा कामाचा दर वेगळा आहे. क्लार्क आणि अधिकाऱ्यांची टक्केवारी जशी असेल त्या प्रमाणात कामाचा दर ठरविला जातो.
हे सर्व सुरू असताना जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाऱ्या अवजड वाहनाच्या प्रवेशासाठी अनधिकृत बने पैसे आकारले जातात हे पैसे लाखोंच्या घरात असतात मात्र आता पैशांची चटक लागलेल्या अधिकाऱ्यांना हा सुटले असून या महिन्यापासून अधिकाऱ्यांनी जड वाहतुकीसाठी रेट वाढवली आहे त्यामुळे पैसे पुरवणारे एजंट आणि त्या अधिकाऱ्यांमध्ये सध्या चांगलीच खडा जंगी होत आहे. कारण पैसे ट्रक मालकाकडून घेऊन ते अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम काही एजंट करत असतात यामध्ये एजंट लोकांनाही खारीचा वाटा मिळत असतो मात्र आता ट्रक चालकही दिवसेंदिवस वाढणाऱ्या या रेट मूळ वैतागले आहेत त्यामुळे अनेक जण पैसे देताना एजंट बरोबर गुजर घालतात आणि रेट वाढवल्यामुळे गाड्या कमी होत असल्यामुळे पैसे कमी झाल्यामुळे तोही या प्रकाराला वैतागून अधिकाऱ्यांना चांगलीच दोन शब्द सुनवत असतो त्यामुळे रेट वाढवण्यावरून साध्या मोठा गदारोळ झाला असला तरी अधिकारी ऐकण्यास तयार नाही.
रेट वाढून दिला नाही तर कारवाई होणारच असा सज्जड दम आहे पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्याने दिला आहे या अधिकाराची पार्श्वभूमी पाहता एजंट ही धास्तावले आहेत. कारण लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या आधी या अधिकाऱ्या विरोधात कारवाई केली आहे तर फ्लाइंग स्क्वॉडने गोळा केलेल्या लक्ष्मी दर्शनावरून थेट आपल्या सहकाऱ्यावर फायर झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे आता जड वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकाकडून पैसे
घेऊन ते अधिकाऱ्यांना देण्याच्या कामावरून एजंट सध्या दुधारी तलवारीवरून चालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.