अहिल्यानगर दिनांक २४ मार्च
नगर शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर पंचवीस वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा २१ फेब्रुवारी २०२६ रोजी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला असून या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ करत होते. मात्र या प्रकरणातील आरोपी पोलिसांना अद्याप सापडला नाही त्यामुळे या प्रकरणातील पीडिता हवालदिल झाली आहे.तिने आता थेट 25 मार्च रोजी आत्मदहनाचा इशारा दिला असून आता माजी महापौर अभिषेक कळमकर याच्या विरोधात अनेक महिला संघटना रस्त्यावर उतरत आहेत. मात्र एक महिना उलटूनही अद्याप प अत्याचार प्रकरणातील आरोपी अभिषेक कळमकर हा पोलिसांच्या हातावर तुरीतून फरार आहे.

अभिषेक कळमकर याचा तपास तोफखाना पोलिसांकडे असताना एक महिन्यात तोफखाना पोलिसांना अभिषेक कळमकर याला पकडण्यात यश आले नाही. त्यामुळे अखेर हा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र तपास वर्ग करून चार दिवस उलटले तरी अद्याप स्थानिक गुन्हे शाखेला आहे आरोपी कळमकर याला पकडण्यात यश आलेले नाही.
संपूर्ण राज्याला हा हादरून टाकणाऱ्या नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात यांच्या तपासाबाबत अहिल्यानगर पोलिसांनी सुरुवातीला छडा लावला होता अशी माहिती समोर येत आहे. मात्र राजकीय वलय असलेला कळमकर याला पकडण्यात अहिल्यानगर पोलीस दल अपयशी का ठरत आहे? असा सवाल ही आता उपस्थित होत असून या प्रकरणातील पिडीतेने 25 मार्च रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखा अभिषेक कळमकर याला पकडतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.