अहमदनगर दि.२१ डिसेंबर
शहर सहकारी बँकेच्या कर्ज प्रकरणात फसवणूक व अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी नीलेश शेळके याचा सीए विजय मर्दा याला एका प्रकरणात सहदिवाणी न्यायाधीश पी.बी. रेमणे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यामुळे आर्थिक गुन्हे पोलिसांनी त्याला शहर सहकारी बँकेच्या दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती
शहर सहकारी बँकेच्या कर्ज प्रकरणात १७ कोटी २५ लाखांची फसवणूक व अपहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा सद्या करत आहे.
उज्ज्वला कवडे यांची फसवणूक केल्या प्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी मर्दा आणि त्याचा साथीदार कदम या दोघांना ताब्यात घेतले असून, दोघांना आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही शनिवार २३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.