Home Uncategorized शहर सहकारी बँक बनावट सोने तारण प्रकरण धक्कादायक बाबी आल्या समोर आधीही...

शहर सहकारी बँक बनावट सोने तारण प्रकरण धक्कादायक बाबी आल्या समोर आधीही त्या डॉक्टरच्या प्रकरणाने बँकेला बसला होता धक्का

अहमदनगर दि.१२ सप्टेंबर

Shahr Sahakari Ban fake gold mortgage case Shocking facts came before the bank was shocked by the case of that doctor

अहमदनगर शहर सहकारी बँके (Shahr Sahakari Bank ) मध्ये बनावट सोने तारण(fake gold mortgage ) ठेवून त्यावर कर्ज उचलण्याचा प्रकार समोर आला आहे. यात बँकेची सुमारे 27 लाखाची फसवणूक झाली आहे. शहर सहकारी बँकेचे व्यवस्थापक दिनेश कुलकर्णी यांनी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बँकेच्या पॅनेलवरील गोल्ड व्हॅल्युअर अजय किशोर कपाले (वय 33 रा. बालिकाश्रम रोड), विशाल संजय चिपाडे (वय 28), ज्ञानेश्‍वर रतन कुताळ (वय 28 दोघे रा. चिपाडे मळा, सारसनगर) व सुनील ज्ञानेश्‍वर अळकुटे (वय 38 रा. सदगुरु टॉवर्स, तपोवन रोड, सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक के असून त्याच्या पोलीस कास्टडीची मुदत आज संपत आहे.

शहर सहकारी बँकेचा गोल्ड व्हॅलीवर अजय कापले हाच खोटे सोने बनवून काही लोकांच्या नावे कर्ज प्रकरण करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या ठिकाणी कुंपणच शेत खात होते असं निदर्शनास येते.हुबेहूब सोन्यासारखे खोटे दागिने बनवून आपल्या ओळखीच्या लोकांच्या नावावर शहर सहकारी बँकेत ते सोन तारण ठेवून कर्ज मिळत होता. सोने तपासणीसाठी खुद्द अजय कपालेच असल्यामुळे त्याचा संशय कोणाला येत नसल्याने हळूहळू करत त्याने सुमारे 27 लाख रुपयांचे सोनेतारण कर्ज काढले होते.यापैकी जे सोनेतारण करण्यासाठी लोक येत होते त्यांना गरजेनुसार पैसे कापले त्यांना देत होता बाकीचे पैसे तो आपल्या खिशात टाकत असे.

शहर सहकारी बँकेत या आधी काही कोट्यावधींचे कर्ज वाटली गेली होती त्यावेळेसही कोणतीही शहानिशा न करता एका डॉक्टरच्या(doctor )वेगवेगळ्या फर्मला तब्बल १७ कर्जप्रकरणात कोट्यवधीचे कर्ज दिले होते. काही डॉक्टरच्या फिर्यादीवरून जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा या कर्ज प्रकरणातील सर्व पोलखोल समोर आले होते.

काही डॉक्टरांच्या तक्रारींवरुन या सर्व घोटाळ्याची सहकार विभागाने चौकशी केली होती. या चौकशीत या एकाच बँकेत त्या डॉक्टरने स्वत:ची तसेच त्याची भागीदारी असलेल्या संस्थांची १७ कर्जप्रकरणे आढळली. ही सर्व कर्जे थकीत आहेत. या थकीत कर्जप्रकरणाची बॅँकेच्या एनपीएत तरतूद करावयाची म्हटले तर त्या एनपीएचे प्रमाण ४५.६८ टक्के होते. यात बँकेचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असल्याचा ठपका या चौकशी अहवालात सहकार विभागाने ठेवला होता.त्या डॉक्टर ची याची भागीदारी असलेल्या हॉस्पिटलच्या मशिनरीसाठी ज्या डॉक्टरांच्या नावे कर्ज दिले गेले त्यात सहकार विभागाला अनेक त्रुटी आढळल्या आहेत. संबंधित डॉक्टरांनी म्हणजे कर्जदारांनी स्वत:ची ३० टक्के रक्कम भरल्यानंतर त्यांना यासाठीचे कर्ज बँकेने द्यायला हवे होते, पण ते न पाहताच कर्ज दिले गेले. मशिनरी पुरवणारे पुरवठादार, डिलर यांची अधिकृतता बँकेने तपासली नाही. कर्ज मंजुरी पत्रातील अटी, शर्ती पाळल्या नसताना व खरेदीच्या पावत्या नसताना कर्ज दिले गेले. कर्जदाराची परतफेडीची क्षमता बँकेने पाहिलेली नाही. कर्ज अदा करण्यासाठी कर्जदार व पुरवठादार यांचे कोणतेही पत्र नसताना बँकेने कर्ज अदा केले. कर्जाचा जो डीडी देण्यात आला त्याची पोहोच पावती देखील बँकेने घेतलेली नाही, असे गंभीर आक्षेप सहकार विभागाचे उपनिबंधक आर.बी. कुलकर्णी यांनी या कर्जप्रकरणांची पाहणी करुन नोंदविले आहेत.

बँकेला एवढा मोठा फटका बसलेला असतानाही बँकेला सोने तारण कर्ज प्रकरणी पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version