अहमदनगर दिनांक 9 ऑक्टोबर
ज्येष्ठ लेखक तसेच निर्भय बनो आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि विविध सामाजिक कार्यात नेहमीच सहभागी होणारे पेशाने मुख्याध्यापक असणारे हेरंब कुलकर्णी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अज्ञात तरुणांनी हल्ला केला होता या हल्ल्यानंतर दोन दिवसानंतर या घटनेची वाच्यता झाली त्यानंतर पोलीस यंत्रणेसह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हेरंब कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांचा दिलासा दिला आहे. या प्रकरणातील आरोपी आता पकडले गेले आहेत.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील तसेच अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी हेरंब कुलकर्णी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगत शालिनीताई विखे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याबरोबर फोनवर चर्चा करून या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याबाबत विनंती केली तसेच हेरंब कुलकर्णी यांच्या निवासस्थानी पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी ही यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केली.
शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी बाबत पोलीस प्रशासनाने कोठर कारवाई करून ही गुन्हेगाराई मोडीत काढावी त्याबाबत कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असेही यावेळी संग्राम जगताप यांनी सांगितले.