Home Uncategorized अमृत पाणी योजनेतून भिंगार शहराला पाणीपुरवठा केला जाईल मनपा आयुक्तांचे शिवसेना जिल्हाध्यक्ष...

अमृत पाणी योजनेतून भिंगार शहराला पाणीपुरवठा केला जाईल मनपा आयुक्तांचे शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्यासह भिंगार पदाधिकाऱ्यांना आश्वासन

अहमदनगर दि.४ नोव्हेंबर –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरसेवक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भिंगार शिवसेना ( शिंदे गट ) यांनी भेट घेतली होती त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे त्यांच्याशी संपर्क साधला व भिंगारच्या पाणीप्रश्न संदर्भात प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करून सदरचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे तात्काळ आदेश दिले, त्याच आदेशानंतर आज शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त दालनात बैठक संपन्न झाली यावेळी आयुक्त यांनी शिष्टमंडळात सांगितले की, लवकरच अमृतपाणी योजनेचे काम पूर्ण होणार असून या पाणी योजनेतून भिंगार शहराला पाणीपुरवठा केला जाईल त्यानुसार योग्य ती पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे असे सांगितले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या दालनात शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भिंगार पाणी प्रश्न संदर्भात बैठक संपन्न झाली यावेळी भिंगार शिवसेना शहरप्रमुख सुनील लालबोंद्रे, नगरसेवक प्रकाश फुलारी, नगरसेवक संजय छजलाणी, नगरसेवक रवींद्र लालबोंद्रे, उपशहरप्रमुख प्रशांत डावरे, प्रसिद्धीप्रमुख शुभम खराडे आदी यावेळी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version