अहमदनगर दि.२३ मार्च
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यामुळे चर्चेला एकच उधाण आले आहे.
महाविकास आघाडी मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष सामील असतानाही उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी अर्ज भरल्यामुळे चर्चांना उधाण आले असून आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं गिरीश जाधव यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले आहे धनशक्ती आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात ही लढाई असून त्यांना चितपट करण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज भरल्याचं गिरीश जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समवेत जाऊन गिरीश जाधव यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र सध्या गिरीश जाधव हे उपजिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत असून त्यांनी भरलेल्या अर्जामुळे शिवसेनेत बंडखोरी तर झाली नाही ना अशी ही चर्चा होऊ लागली आहे तसेच जर गिरीश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर माहितीच्या उमेदवारांसमोर ही एक मोठी डोकेदुखी ठरू शकते.