HomeUncategorizedजुने नाले ओढे बुजवण्याचे प्रकरण ताजे असतानाच नवीन ओढा बुजवून सिमेंट नळ्या...

जुने नाले ओढे बुजवण्याचे प्रकरण ताजे असतानाच नवीन ओढा बुजवून सिमेंट नळ्या टाकण्याचा प्रकार… नरहरी नगर पुन्हा एकदा पाण्यात जाण्याची शक्यता मनपा बघ्याची भूमिका का घेतेय?

advertisement

अहमदनगर दि.२५ एप्रिल
महापालिका हद्दीतील ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमण झाले असून पाईप टाकून रस्ते घर बांधल्याचे प्रकरण अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याबाबत अहमदनगर शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते शशिकांत चेंगेडे यांनी महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी केल्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि थेट उप लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे. मात्र अद्यापही बुजवलेले ओढे नाले खुले करण्यात आलेली नाहीत. दर पावसाळ्यामध्ये या बुजवलेल्या ओढ्या नाल्यांमुळे अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरते त्यावेळेस या बुजवलेल्या ओढया नाल्यांचे प्रकरण पुन्हा जिवंत होते महानगरपालिकेकडून नोटीसा पाठवल्या जातात आणि काही दिवस झाल्यानंतर पुन्हा जैसे थे असेच काहीसे हे प्रकरण सध्या महानगरपालिका हाताळत आहे.

सावेडी उपनगरासह मुख्य शहरात सुमारे 45 ठिकाणी ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमण असून, पाईप टाकून ओढे बुजविले आहेत, त्यातील पाईप कधी काढणार, हे महापालिकेने स्पष्ट केलेलेच नाही. असे असतानाच अजून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पुन्हा एक नाला सिमेंट नळ्या टाकून बुजवण्यात आला असून अहमदनगर महानगरपालिकेने या बुजवलेल्या ओढ्यावर बांधकाम परवानगी दिली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गुलमोहर रोड वरील आनंद शाळेसमोरून आसरा सोसायटीकडे जाणाऱ्या रोडवर नरहरी नगर कडून एक नैसर्गिक ओढा आलेला आहे एका ओढ्यावर पाईप टाकून ओढा बुजवण्यात आला आहे आणि त्या ठिकाणी आता महानगरपालिकेने संबंधित प्लॉट धारकाला परवानगी दिली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पुढे नाले बुजवण्यात महानगरपालिका कशा प्रकारे हातभार लावते याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. दर पावसाळ्यामध्ये नरहरी नगर मधील बहुतांश घरे हे पाण्याखाली जात असतात कारण नरहरी नगर पासून पुढे जाणाऱ्या नैसर्गिक ओढ्य नाल्यांवर अधिक्रमणे झाल्यामुळे संपूर्ण पाणी हे नरहरी नगरमध्ये जमा होते आणि अनेक लोकांचे घर पाण्याखाली जात असतात हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना आता पुन्हा सिमेंट नळ्या टाकून नाला बुजवण्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे महानगरपालिका मुद्दाहून हे काम करत आहे का ? की कोणाच्या दबाव खाली हे काम केले जात आहे. असा प्रश्न उपस्थित राहत आहे. एकीकडे जनता महानगरपालिकेचा कर भरून सुख सुविधा मिळावा यासाठी पाठपुरावा करत असताना महानगरपालिका नागरिकांची असुविधा कशी होईल असाच प्रयत्न तर करत नाही ना ! असा सवाल आता उपस्थित राहतोय त्यामुळे या नव्याने टाकलेल्या नाल्या मधील पाईप काढून काढून टाकावे अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे. अन्यथा पावसाळ्यात पुन्हा या ठिकाणी पाणी तुंबून मागील घरामध्ये पाणी जाऊ शकते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular