अहिल्यानगर दिनांक 4 नोव्हेंबर
नगर शहर मतदारसंघात महाविकास आघाडी मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे
अर्ज मागे घेण्यासाठी 15 सेकंद उशिरा पोहोचल्याने आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकलो नाही अशी प्रतिक्रिया शशिकांत गाडे यांनी दिली आहे. अचानक झालेल्या या ट्विस्ट मुळे नगर शहर मतदारसंघात निवडणुकीत रंगत आली आहे. विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले सर्व उमेदवार वेळेआधी अर्ज माघारी घेण्याच्या कार्यालयाबाहेर उपस्थित होते. मात्र कार्यालया बाहेरच बराच वेळ चर्चा झाल्यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी सर्व उमेदवार आत गेले होते त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चिन्ह आहे.