अहमदनगर
अहमदनगर जिल्हा न्यायालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात आला असताना विरोध करण्यात आला मनसे नेत्या अनिता दिघे आणि शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष स्मिता अष्टेकर यांनी सुषमा अंधारे यांच्या अंगावर धावून जात न्यायालयातून बाहेर जाण्याचे फर्मान काढले होते.
सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत येण्यापूर्वी केलेल्या भाषणांच्या क्लिप आता चांगल्या व्हायरल होत असून सुषमा अंधारे यांनी त्यावेळी भाषण करताना हिंदू देवदेवतांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानंतरही सुषमा अंधारे यांना शिवसेनेत उपनेतेपद दिले असल्याचा आरोप करत स्मिता अष्टेकर यांनी त्यांच्या अंगावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना पकडल्या मुळे पुढील अनर्थ टाळला.
या प्रकरणामुळे न्यायालयात काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते.
हिंदू देवतांबद्दल आणि रामा बद्दल केलेल्या विधानामुळे आपण त्यांना विरोध केला असल्यास स्मिता अष्टेकर यांनी सांगितला आहे तर जिल्हा न्यायालयात येऊन राजकीय भूमिका मांडल्याबद्दल आपण त्यांना विरोध केलाच अनिता दिघे यांनी सांगितले