Homeजिल्हाकेमिकलयुक्त पाण्यामुळे होतयेत फेसाचे डोंगर या प्रदूषणाकडे कोण लक्ष देणार नागरिकांच्या आरोग्यावर...

केमिकलयुक्त पाण्यामुळे होतयेत फेसाचे डोंगर या प्रदूषणाकडे कोण लक्ष देणार नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

advertisement

अहमदनगर दि.४ ऑगस्ट
अहमदनगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीत केमिकल युक्त पाणी सोडत असल्याने फेसाचे डोंगर होत असून. नगर शहरातुन वाहणारी सीना नदी किती प्रदूषित आहे याचं उदाहरण या साचलेल्या फेसा वरून लक्षात येत आहे. या आधी अनेक वेळा असा फेस तयार झाला आहे मात्र प्रदूषण महामंडळ याकडे लक्ष देण्यास तयार नाही नगर शहरातून वाहणारी नदी ही एमआयडीसीच्या जवळून वाहत येते तर एमआयडीसी परिसरातील छोट्या-मोठ्या ओढ्या नाल्यात केमिकल युक्त पाणी सोडल्याने हे पाणी सीना नदीला येऊन मिळाल्यानंतर पुढे हे पाणी कर्जत जामखेड तालुक्यात नदीद्वारे वाहत जाते. या प्रदूषणाकडे या आधी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी प्रदूषणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून याकडे लक्ष वेधले होते मात्र तरीही याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही.

अहमदनगर शहरातून वाहणाऱ्या या नदीवर पुढे कर्जत तालुक्यात मोठे धरण असून या धरणाच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील अनेक गावांना पाणी तसेच शेतीसाठी पाण्याचा उपयोग होत असतो. मात्र जर केमिकल युक्त पाणी त्या ठिकाणी जात असेल तर भविष्यात येथील शेतकऱ्यांची जमीन खराब होऊ शकते आणि त्यांच्या आरोग्यावरही घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या केमिकल युक्त पाण्याचा शोध लावून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular