Home शहर झोपलेले नगरकर… माजलेले गुंड… बघ्याच्या भूमिकेत पोलीस… एकमेकांवर आरोप करण्यात गुंग असलेले...

झोपलेले नगरकर… माजलेले गुंड… बघ्याच्या भूमिकेत पोलीस… एकमेकांवर आरोप करण्यात गुंग असलेले राजकारणी आणि सुस्त प्रशासन यामुळेच नगर वेगळ्याच दिशेला चाललंय..

अहमदनगर दि. ११ऑक्टोबर

काना आणि मात्रा नसलेले ऐतिहासिक अहमदनगर शहर या शहरात अनेक धक्कादायक गोष्टी नेहमीच घडत असतात राज्याला दिशा देणारा म्हणून अहमदनगर जिल्हा अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख असली तरी अहमदनगर शहर दिवसेंदिवस वेगळ्याच दिशेला जात आहे.


अहमदनगर शहरातील विकासाबाबत जे अनेक वर्षांपासून ओरड होत आहे. छोटे-मोठे गल्लीबोळ आणि वाढते उपनगर यामध्ये विकास आता कुठेतरी पाहायला मिळालाय मात्र या आधी खेडे म्हणून या शहराची ओळख निर्माण झालेली आहे ती आजपर्यंत थोडीफार का होईना टिकून आहे.

शहरातील गुंडागिरी अवैध्य व्यवसायाचा खेळ हा वर्षानुवर्ष तसाच सुरू आहे. ताबेमारी, फसवणूक,बळजबरीने वर्गणी मागणे, व्यापाऱ्यांना त्रास देणे तसेच अवैद्य धंद्यातून येणारा बक्कळ पैसा आणि त्यातून पोसणारी गुंडागिरी हे सर्वांना माहीत असूनही याबाबत कधीही आवाज उठवला जात नाही याला संपूर्ण जबाबदार हे नगर मधील रहिवासीच आहेत. शहराच्या विकासाबाबत अनेक वर्ष चर्चा होत आहेत मात्र विकासाबाबत ठोस निर्णय कधीच होत नाही. महानगरपालिकेला जाब विचारण्यासाठी कुणीही जात नाही ना आपल्या नगरसेवकाला, लोकप्रतिनिधीला तोंडावर कधी जाब विचारला जात नाही. खड्ड्यातून वाट काढत आम्ही जाऊ मात्र प्रशासन आणि राजकारण्यांना आम्ही जाब विचारणार नाही अशी सोशिक भूमिका निद्रस्त नगरकर नेहमीच घेत असतात. स्वतःहून नगरकर कधीच रस्त्यावर उतरलेले नाही पण स्वतःच्या हक्कासाठी असो किंवा गुंडागिरी विरुद्ध असो किंवा इतर कारणांसाठी असो नगरकर रस्त्यावर कधीच उतरत नाही. नगरकरांना रस्त्यावर उतरण्यासाठी कोणत्यातरी राजकारणी माणसाचा टेकू घ्यावा लागतो आणि हा राजकारणी माणूस मग याचा फायदा आपल्या मतांसाठी वापर करून घेतो हे त्रिवार सत्य आहे.

पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन अथवा जिल्हाधिकारी यांनी अहमदनगर शहरात कडे कधीच गांभीर्याने पाहिले नाही नगर शहरातील अरुंद रस्ते अतिक्रमण तसेच अवैध व्यवसाय वर्ष नो वर्ष तसेच चालू आहेत एक पिढी गेली की दुसरी पिढीकडे हे अवैद्य धंदे हस्तांतरित केले जातात हे पोलिसांना माहीत असूनही पोलीस मात्र फक्त बघ्याची भूमिका घेतात मोठे अधिकारी वर्ष दोन वर्षासाठी अहमदनगर शहरामध्ये येतात मात्र त्यांना अहमदनगर शहराचे काहीच घेणं देणं नसल्याने नगर शहराचा विकास गुंतलेला आहे.

जरी एखाद्या अधिकाऱ्याला वाटले की अहमदनगर शहर बाबत चांगला विचार व्हावा मात्र या विचाराला तडा देण्यासाठी राजकारणी लगेच उभे राहतात एखादी चांगली सुविधा सुरू झाली तर त्यामध्ये राजकारण आणून ती बंद कशी करावी यामध्ये अहमदनगरच्या राजकारण्यांचा हातखंडा आहे.

वैयक्तिक हेव्यादाव्यातून अहमदनगर शहरामध्ये राजकारण होत असते त्यामुळे नगर शहराचा विकास कधीच होणार नाही जर नगर शहराचा विकास करायचा असेल तर असे राजकारण सर्वप्रथम बाजूला ठेवलं पाहिजे वैयक्तिक हेवे दावे आणि त्यातून होणारे राजकारण यामुळे अहमदनगर शहर भकास होत चालले आहे निद्रस्त नगरकर आणि बघ्याची भूमिका घेणारे प्रशासन याचा फायदा राजकारणी घेतात आणि नगरकारांच्या माथी नेहमीच समस्यांना तोंड देण्याचे भाग्य लाभत असेच म्हणता येईल. आता हे कुठेतरी बदलायला हवं नगरकरांनी जागृत होऊन रस्त्यावर उतरायला हवं मग ते कोणत्याही प्रश्नासाठी असो गुंडागरी, विकास अथवा इतर काही प्रश्न आहेत त्यासाठी नगरकरांनी एकत्र होऊन राजकारण विरहित रस्त्यावर उतरलं तरच नगर शहराचं रूप आपण बदलू शकतो नाहीतर नगर एक खेड म्हणून आपण आपलं शहर पुढच्या पिढीकडे सोपवून देऊ…

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version