नागपूर दिनांक १४ मे
परप्रांतीय तरुणी आणून स्पा च्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या स्पा सेंटरमध्ये आसाम नागालँड अरुणाचल प्रदेश सिक्कीम आणि मणिपूर राज्यातील तरुणींना कामासाठी आणण्यात आले होते.
नागपूर येथील बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रद्धानंदपेठमधील ‘डीलाईट स्पा’मधील सर्वात मोठ्या देहव्यापारावर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला. या छाप्यात पाच तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. स्पा-मालक आणि व्यवस्थापकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रहानुद्दीन शहाबुद्दीन (आसाम) आणि रिजूल अली इस्माईल अली (२६, गुवहाटी, आसाम) अशी आरोपींची नावे आहेत.
‘डिलाईट स्पा’ नावाने मसाज सेंटर मधे आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मणिपूर राज्यातील तरुणी स्पामध्ये मसाजची कामे करीत होत्या. मात्र, मसाजच्या आड तरुणींकडून स्पा सेंटरचा मालक रहानुद्दीन हा देहव्यापार करवून घेत होता. पाचही मुलींची राहण्याची व्यवस्था स्पामधील एका खोलीत करण्यात आली होती. त्यामुळे त्या तरुणींना ग्राहक आल्यानंतर देहव्यापारासाठी नकार देता येत नव्हता.
गेल्या दोन वर्षांपासून तरुणींचे लैंगिक शोषण या मसाज सेंटरमध्ये सुरु होते. मसाज पार्लरवर दिवसेंदिवस आंबटशौकीनांची गर्दी वाढत होती. त्यामुळे शेजारी असलेल्या नागरिकांना संशय आला. यासोबतच काही पोलीस कर्मचारीसुद्धा तेथे भेटी देत होते. त्यामुळे नागरिकांनी थेट पोलीस उपायुक्तांना देहव्यापाराच्या अड्ड्याची माहिती दिली. त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा घातला.
या छाप्यात पाचही तरुणींना अर्धनग्नावस्थेत आढळून आल्या. तसेच एका आंबटशौकीन ग्राहकाशी रिजूल अली हा सौदेबाजी करीत होता. ग्राहकासमोर तरुणी उभ्या करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी रिजूलला अटक केली तर पाचही तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली.
देहव्यापारात सहभागी असलेल्या तरुणी १८ ते २५ वयोगटातील असून त्यांना नोकरीचे आमिष दाखवून नागपुरात आणले होते. तरुणींकडून बळजबरी देहव्यापार करवून घेण्यात येत होता. स्पा सेंटरचा मालक रहानुद्दीन याचे एका पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांशी ‘अर्थपूर्ण’ होते. त्यामुळे आतापर्यंत या मसाज पार्लरवर छापा पडला नव्हता. मात्र, गुन्हे शाखेच्या युनिटने अचानक छापा घातल्यामुळे काही पोलीस कर्मचारी अडचणीत आले आहेत, अशी चर्चा आहे.
याचप्रमाणे नगर शहरातही काही परप्रांतीय तरुणी स्पा सेंटरच्या नावाखाली नगर शहरात आल्या असून या परप्रांतीय तरुणांची नोंद कुठेही नसून
काही ठिकाणी देह व्यापार सुरू असल्याची चर्चा त्या स्पा सेंटरच्या आजूबाजू मध्ये राहत असलेल्या नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे पोलिसांनी कायदेशीर या स्पा सेंटरची चौकशी करून तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच पोलिसांकडून स्पा सेंटर चालवण्याबाबत तसेच विविध सरकारी कार्यालयांकडून स्पा सेंटर चालवण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले आहेत का ? याची तपासणी करणे गरजेचे आहे. थोड्याशा पैशासाठी आंबट शौकीन लोकांच्या मौज मजेसाठी हे स्पा सेंटर तर सुरू नाहीत ना असा प्रश्न ही आता समोर येऊ लागला आहे. तसेच स्पा सेंटरमध्ये काम झालेल्या मुलींची फसवणूक तर झाली नसेल ना? तसेच त्यांची आर्थिक पिळवणूक होत असेल का यासाठी ही तपासणी होणे गरजेचे आहे.