HomeUncategorizedलोकसभा निवडणुकीत आमदार राम शिंदे खासदार विखे यांचे काम करणार का ?...

लोकसभा निवडणुकीत आमदार राम शिंदे खासदार विखे यांचे काम करणार का ? की मित्र म्हणून निलेश लंके यांच्याकडे झुकते माप असणार…

advertisement

अहमदनगर दि.१७ मार्च
लोकसभेचे रणशिंग फुंकले गेले असून निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक सुरू झाली आहे. अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात मात्र निवडणुकीचे वातावरण अनेक महिन्यांपासून सुरू होतो असंच म्हणतात म्हणता येईल कारण निवडणुकीला खासदार सुजय विखे पाटील हे पुन्हा उभे राहणार हे सर्वश्रुत असतानाच थेट त्यांच्याच पक्षातून अनेक जण इच्छुक असल्याचे वेळोवेळी बोलून दाखवत होते. त्यामुळे विरोधकांपेक्षा स्वपक्षातील नेत्यांकडे खासदार सुजय विखे पाटील यांना जास्त लक्ष द्यावा लागलं.

आमदार राम शिंदे यांनी गेल्या एक वर्षापासून आपण लोकसभेला इच्छुक असल्याचे वेळोवेळी सांगितलं एवढेच नव्हे तर त्यांनी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात दंड थोपटून खासदार विखे यांचे राजकीय विरोधक असलेले निलेश लंके यांच्याशी जवळीक वाढवली. दिवाळीच्या फराळापासून ते एकमेकांच्या गाडीचे सारथ्य करण्यापर्यंत त्यांच्या मैत्रीची चर्चा होत होती. आमदार निलेश लंके यांनीही वेळोवेळी पक्षाचा आदेश आल्यानंतर आपण लोकसभा निवडणूक लढू शकतो असे स्पष्टीकरण दिले होते. नगर पाथर्डी रोडचे रखडलेले काम आमदार निलेश लंके यांच्या उपोषणामुळे सुरू झाले आणि त्यानंतर निलेश लंके यांनी खासदारकीची तयारी सुरू केली अशी चर्चा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुरू होती. आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदे वेळोवेळी खासदार विखे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधताना अनेक कार्यक्रमात मतदारसंघात पाहिले गेले एवढेच नव्हे तर निवडणुकीच्या तोंडावर मागील काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर शहरात छत्रपती संभाजी महाराज या महानाट्याचा प्रयोग ठेवला होता या प्रयोगाला सुद्धा आमदार राम शिंदे यांनी हजेरी लावली होती.

भाजप आमदार राम शिंदे यांनी या कार्यक्रमात निमित्ताने आमदार निलेश लंके यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. एवढेच नाही तर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानची यामुळे चौकशी होऊ शकते अशी भीती देखील व्यक्त केली होती. तसेच यावेळी बोलताना आमदार राम शिंदे यांनी, टी-ट्वेन्टीमध्ये कमी चेंडूंत सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूचा जसा रनरेट असतो तसा आमदार नीलेश लंके यांचा रनरेट सर्वाधिक असल्याचे म्हटले होते. ते सर्वाधिक लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेले आमदार असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले होते. त्यामुळे त्यांना भविष्याची कसलीही काळजी करण्याचे कारण नाही. छत्रपती संभाजी महारांजाचा इतिहास इतक्या वर्षांनंतरही दैदिप्यमान आहे. लोकांना जे हवे आहे ते देण्याचे काम आमदार लंके यांनी केले आहे, अशा शब्दात आमदार राम शिंदे यांनी आमदार निलेश लंके यांचे कौतुक यावेळी केले होते.

मात्र आता भाजपने अहमदनगर दक्षिण मतदार संघातून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केल्यामुळे आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आमदार निलेश लंके यांनी अजित दादा पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या गटाची तूतारी हाती घेतल्याचं सर्वश्रुत आहे. मात्र अद्यापही आपण शरद पवार गटामध्ये प्रवेश केला असे कुठेही निलेश लंके यांनी प्रसार माध्यमांना सांगितले नाही. अद्यापही निलेश लंके प्रश्नाला उत्तर देताना स्पष्टपणे उत्तर देत नसल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना संभ्रम निर्माण होत आहे. तर दुसरीकडे खासदार सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी जाहीर होताच प्रचाराला सुरुवात केली आहे. तर कालपर्यंत खासदार सुजय विखे पाटील यांना तिकीट मिळणारच नाही असे पैज लावून सांगणारे आज खासदार सुजय विखे पाटील यांच्या मागेपुढे फिरताना दिसत आहेत.

आता पुन्हा एकदा बाजी खासदार सुजय विखे यांच्याकडे आल्यामुळे आमदार राम शिंदे नेमकी काय भूमिका घेतात याकडे अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे त्यांचे मित्र आमदार निलेश लंके या निवडणुकीत तुतारी चिन्ह घेऊन उभे राहिले तर आमदार राम शिंदे त्यांना मदत करणार की पक्ष म्हणून भाजपचेच काम करणार याकडे आता संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.

या सर्व घडामोडीत आमदार निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड तालुक्याचे आमदार रोहित पवार यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया न आल्याने त्यांचे मौन बरेच काही बोलून जात आहे. कारण खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार रोहित पवार हे मित्र आहेत. तर आमदार राम शिंदे आणि आमदार निलेश लंके यांची जवळची मैत्री आहे. राजकीय क्षेत्रात आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार विरोधात आहे तर मग आता आमदार राम शिंदे आणि निलेश यांचे मित्र आहेत त्यामुळे पुढील राजकीय गणितात विधानसभेत निलेश लंके यांना आमदार रोहित पवारांची साथ द्यावा लागेल तर आमदार राम शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत खासदार सुजय विखे पाटील यांची साथ द्यावा लागेल मात्र तसे होईल का ? हेही पाणी आता मोठे मनोरंजनात्मक होणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत अनेक विचित्र घडामोडी घडण्याची शक्यता आहे तर लोकसभा निवडणुकीचे उट्टे विधानसभा निवडणुकीतही निघू शकतात हेही राजकीय जाणकारांचे मत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular