अहमदनगर दि.३० जुलै
राज्यभरात आषाढी एकादशीनिमित्ताने उत्साहाचे वातावरण होते त्याचबरोबर मुस्लिम बांधवांचा ईद ऊल अजहा अर्थात बकरी ईदचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळाला. दोन्ही सण उत्साहात साजरे झाले. सुपा गावातील मुस्लिम बांधवांनी आज सकाळी नमाज पठण करत बकरी ईदच्या निमित्ताने दिली जाणारी कुर्बानी पुढे ढकलली. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी आज एकत्र आषाढी एकादशी आणि ईद साजरी केली.
सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी ईद आणि आषाढी एकादशी च्या पार्श्व भूमीवर दोन्ही समाजाच्या प्रमुखांची बैठक घेऊन दोन्ही सण धार्मिक सलोखा राखून साजरे करण्याचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देऊन सूपा गावकऱ्यांनी सकारात्मक पाऊल उचलले होते.
राज्यभरात आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्याचबरोबर मुस्लिम बांधवांचा बकरी ईदचा उत्साह देशभरात पाहायला मिळाला. आषाढी एकादशी आणि बकरी ईदचा दुग्ध शर्करा योग जुळून आला होता. दरम्यान सुपा गावातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी आज एकत्र आषाढी एकादशी आणि ईद साजरी केली. आज आषाढी एकादशी असल्याने सुपा येथील मुस्लिम बांधवांनी ईदच्या निमित्ताने दिली जाणारी कुर्बानी पुढे ढकलत, सामाजिक सलोखा जपला आहे.
बकरी ईद निमित्त मस्जिदमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी बस
स्थानक चौकात जात तेथे आलेल्या दिंडीतील विठ्ठल रूख्मिणीच्या वेशभुषेतील बाल वारकऱ्यांसह इतर हिंदू बांधवांची भेट घेत आषाढी
एकादशी व ईदच्या शुभेच्छांची देवाण
घेवाण केली. मुस्लिम बांधवांचे नमाज पठण सुरू
असतानाच गुरूदेव इंग्लिश मिडियम स्कुलच्या बाल वारकऱ्यांची दिंडी सुपा गावामध्ये ग्रामप्रदक्षिणेसाठी आलेली होती. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी बसस्थानक परीसरात जाऊन दिंडीतील विठ्ठल रूख्मिणीची वेशभुषा केलेल्या चिमुकल्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. दिंडीतील इतर बाल
वारकरी तसेच उपस्थित हिंदू बांधवांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छादेत हिंदू-मुस्लिम बंधूभावाचे अनोखे दर्शन घडविले.
सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी गुरूवारी चोख बंदोबस्त ठेऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली.